शिवाजी महाराज जयंती[ 19 फेब्रुवारी 2026)

बातमी शेअर करा.

प्रतिनिधी:प्रा.ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे, सर(एम ए.बी अहिल्यानगर. शिवकाळात सुखात नांदत होती प्रजा=म्हणून म्हणती शिवबा माझा जाणता राजा^ शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1930 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडील छत्रपती शहाजीराजे भोसले आणि माता जिजाऊ यांच्या संस्कारामुळे शिवाजी महाराज एक परिपूर्ण योद्धा आणि राजा बनले. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ स 1674 मध्ये रायगडावर शिवराज्याभिषेक करून घेतला. छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा सन त्यांच्या जन्म दिनाचे स्मरण म्हणून साजरा केला जातो. शिवाजी महाराज एक योद्धा नव्हते दूरदर्शी कुशल प्रशासक आणि न्यायप्रिय राजा होते होते. त्यांच्या विचारसरणीने आणि पराक्रमाने मराठी माणसाच्या मनामनात स्वाभिमान जागा झाला. अभिमान आणि प्रेरणा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्र भर दरवर्षी 19 फेब्रुवारीला मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरी केली जाते. महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतामध्ये हा सण मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषात साजरा करण्यात येतो. या दिवशी महाराष्ट्रभर ठिकाणी संस्कृतीक कार्यक्रमाचे देखील आयोजन केले जाते. महाराजांच्या गड किल्ल्यावर विविध अशा प्रकारचे मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. इथे लोक इतिहासाचे पुनस्मरण करून महाराजांचे विचार पसरवितात. विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अनेक ठिकाणी मंडळी शिवरायां च्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून देवाप्रमाणे पूजा करतात. आणि संध्याकाळी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. लहान थोरांपासून सर्वजण या शिवाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेऊन त्यांच्या महान कार्य विषयी माहिती सांगतात. या कार्यक्रमात शिवाजी महाराजांचे जीवन कार्य पराक्रम आणि आदर्श संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचविण्याची काम केले जाते. तरुण मंडळी पारंपरिक कपडे घालून मिरवणूक काढतात.यामध्ये पारंपारिक पोवाडे आणि लेझीम पथके देखील तयार केले जातात. गावागावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर विविध अशा प्रकारची पथनाट्य बसविले जातात. लहान थोरांपासून या कार्यक्रमांमध्ये सर्व लोक मोठ्या आनंदाने उत्साहाने सहभागी होतात. आजच्या काळात मात्र शिवजयंतीला एका ऐतिहासिक सामाजिक आणि पर्यावरणीय अशा प्रकारचा दृष्टिकोन मिळालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी समाजामध्ये राज्य करताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सैन्य दलामध्ये देखील अतिशय मोठ्या प्रमाणात शिस्त होती .शिवाजी महाराजांच्या सैन्याने कोणत्याही शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही अशा प्रकारची दक्षता घेतली होती. अतिशय कडक अशा प्रकारची शिस्त शिवाजी महाराजांच्या सैन्य दलात होती. आणि जो कोणी चूक करेल त्याला मात्र शासनही तशा कडक प्रकारचे केले जात होते. शिवाजी महाराजांचे संपूर्ण सैन्य नोकर चाकर अतिशय शिस्तप्रिय होते. शिवाजी महाराजांची ते अतिशय प्रामाणिकपणे सेवा करीत असे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे नोकर चाकर अतिशय प्रामाणिक होते. म्हणून शिवाजी महाराजांना स्वराज्य घडविण्या पाठीमागे कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. . शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने अनेक लोक रक्तदाना सारखे सामाजिक उपक्रम राबवून महाराजांच्या लोकहितवादी आणि न्यायप्रिय भूमिकेचे स्मरण करतात. छत्रपती शिवाजी महाराज हा एक सण नाही .तो महाराष्ट्रातील संस्कृतीचा तो एक आत्मा आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा दिवस आपल्याला फक्त इतिहासाची आठवण करून देत नाही तर भविष्यकाळासाठी शिवरायांच्या शिकवणीचे आदर्श आपल्या मनामनामध्ये रुजवण्याचे काम करतो शिवाजी महाराजांचे आदर्श त्यांची नेतृत्व करण्याची क्षमता. आणि न्यायप्रियता यांना अनुसरून आपणही आपले जीवन अधिक प्रगत आणि सामर्थ्यवान करावे.असे माझे प्रामाणिक मत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण देखील समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करावा.आणि असे केले तरच आपला भारत देश प्रगतीपथावर तर आहेच परंतु आपल्या या भारत देशाची अधिकाधिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. विनंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने मी माझ्या तमाम बंधू भगिनींना नम्रपणे सूचित करी इच्छितो की आपण काही अंशी का होईना शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणावेत आणि तशा पद्धतीने आचरण करावे. छत्रपती शाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जिजामाता. व आदींसारख्या थोर पुरुषांच्या विचारांची आचरण करावे. तरुणवर्गांनी सध्याच्या या जीव घेण्या व्यसनांपासून सावध राहावे शरीर तंदुरुस्त ठेवावे.निरोगी राहण्याचा प्रयत्न करावा. आणि देशाच्या उपयोगी पडावे. वृद्ध माता पित्याची सेवा करा त्यांना वृद्धाश्रमांपासून दूर ठेवा. आपल्या माता भगिनींचे रक्षण करा. जीवनात चांगले सत्कार्य करण्याचा प्रयत्न करा. कितीही कमवले तरी ते जागेवरच राहणार आहे. थोडक्यात संसार केला कोट्यानं कोटी परंतु मेल्यावर मात्र संग येईना लंगोटी अशी आपली अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने मी माझ्या अभ्यासा अंती नम्रपणे असे सांगू इच्छितो की शिवकाळात सुखात नांदत होती प्रजा.म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा शेवटी मी जाता जाता असे म्हणेल की, सागराचे पाणी कधी आटणार नाहीस्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही.हा जन्म काय हजार जन्म झाले, तरी नाद शिवरायां चा सुटणार नाही जय हिंद जय शिवराय=

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *