इगतपुरी-पिंपरी ते गोंदे दुमाला राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 रस्त्याचे काम मंद गतीने सुरू,

बातमी शेअर करा.

प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर, घोटी. राष्ट्रीय महामार्ग ३ (NH 3), जो आता नवीन क्रमांकांकनानुसार NH 44 चा भाग आहे, हा भारतातील एक प्रमुख रस्ता असून तो उत्तर प्रदेशातील आग्रा ते महाराष्ट्रातील मुंबई (ठाणे) पर्यंत सुमारे ११६१ किमी लांबीचा आहे. हा महामार्ग ग्वाल्हेर, इंदूर, धुळे, आणि नाशिक, या प्रमुख शहरांमधून जातो आणि व्यापारी व दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
गेल्या अनेक दिवसापासून रस्त्याचे काम मंद गतीने चालणे हे प्रामुख्याने नियोजनाचा अभाव, याचा थेट परिणाम रहदारीची कोंडी, अपघात वाढण्याची शक्यता, धूळ व प्रदूषण आणि स्थानिक लोकांच्या दैनंदिन जीवनातील त्रासामध्ये होतो, रस्त्याच्या कडेला भला मोठा खड्डा कुठल्याही प्रकारची सेफ्टी नाही, कुठल्या प्रकारची मजबूत बॅरिकेटिंग नाही. एका पट्टीच्या आधारवरती काम चालू, अंधारामध्ये अनेक ठिकाणी खड्डे दिसत नाही, त्यामुळे अनेक वाहनांचे अपघात होत आहे. प्रवाशांच्या जीवे धोका निर्माण झालेल्या आहे, कॉन्ट्रॅक्टदार योग्य पद्धतीची सेफ्टी न बाळगता कामे करत आहे, कामात निष्काळजीपणा आढळत आहे.कंत्राटदारावर कडक कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे.
माननीय तहसीलदार इगतपुरी यांना वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष शरद खंडू सोनवणे, तसेच तालुका महासचिव डॉ.आर.वाय.गाडे, यांच्याकडून निवेदन देण्यात आले, यावेळी उपस्थित ईगतपुरी तालुका संघटक मिलिंद शिंदे, वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा संघटक नंदुदादा पगारे, व सर्व पदअधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थितीत होते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केलेल्या नियोमालंद्यनाचे प्रकार समोर आल्यामुळे नागरिकांचे आणि प्रवाशांची जीवे धोका निर्माण झाला असून सुरक्षेच्या बाबतीत बेजबाबदारीने अनेक अपघातातून जीव गमावले आणि धोका निर्माण झाला आहे. यावर कडक कारवाई करण्यात यावी असे, निवेदन वंचित बहुजन आघाडी च्या वतीने देण्यात आले, कारवाई न केल्यास तिव्र आंदोलनाचा इधारा देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *