माझ्या भिमाची सावली दिन दलितांची माता रमाई,

बातमी शेअर करा.

प्रतिनिधी – प्रा. ज्ञानेश्वर कृष्णा जी बनसोडे सर (एम ए . बी . एड )अहिल्या नगर

दि.07/02/2026,माता रमाबाई आंबेडकर यांचा जन्म 7 फेब्रुवारी1898 रोजी वनंद गावाच्या एका अतिशय गरीब कुटुंबामध्ये झाला होता. रमाबाईचे आई वडील वनंदगावच्या नदीकाठी राहत असे. रमाबाईंना तीन बहिणी व एक भाऊ होता. रमाबाई लहान असताना त्यांच्या आईचे निधन झाले होते. रमाबाई भीमरावआंबेडकर या बाबासाहेबांच्या पहिल्या पत्नी होत्या .आंबेडकरांनुयायी त्यांना आईची उपमा देत रमाई संबोधत असे. रमाबाई आंबेडकर यांचा जन्म एका गरीब कुटुंबात त झाला असल्याने सुरुवातीपासूनच अतिशय हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगावे लागले. त्यांचे वडील भिकू धोत्रे व आई रुक्मिणी यांच्या सह रमाबाई दाभोळ बंदराजवळ व नंतर गावात नदीकाठी महापुरा वस्तीमध्ये राहत असे. रमाबाईंना तीन बहिणी व शंकर नावाचा भाऊ होता .मोठी बहीण दापोलीत दिली होती. अतिशय गरीब परिस्थिती असल्यामुळे वडील भिकू धुत्रे, हे बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यंत पोहोचवण्याचे काम करत असे . सततच्या या जड कामाने त्यांचे वडिलांना छातीचा त्रास सुरू झाला.रमाबाई लहान असताना त्यांच्या आईचे आजारपणात निधन झाले. आईच्या या अचानक जाण्याने रमाबाई यांच्या मनावर फार मोठा आघात झाला. तशात त्यांची धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर हे वयाने अतिशय लहान होते. कालांतराने थोड्याच दिवसांमध्ये वडील भिकू यांचे निधन झाले. आता हे सर्व भाऊ-बहीण आई-वडिलांना पोरके झाले. नंतरच्या पुढील काळात वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीमध्ये राहावयास गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व रमाई सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहण्याच्या शोधात होते . वधूपाहण्याचे शोधात असतानाच सुभेदारांना भायखळा मार्केट जवळ राहणाऱ्या वलंगकारांकडे लग्नाची मुलगी असल्याचे समजले सुभेदारांना रमा पसंत पडली .त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुढे दिली .रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये इसवी सन 1906 यावर्षी मोठ्या उत्साह मध्ये पार पडले. लग्नाचे विवाहप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वय अवघे 14 वर्षाचे होते .तर रमाईचे वय फक्त नऊ वर्षे इतके होते .त्या काळामध्ये बालविवाहाची प्रथा समाजामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात रुढ होती. .लग्नामध्ये लग्न मंडप. तसेच जेवण .झगमग रोशनी असला कुठल्याही प्रकार त्या काळामध्ये नव्हता. त्या काळातील लग्न ही अतिशय साध्या पद्धतीने पार पाडली जात असे. माता रमाई यांना जीवनामध्ये अतिशय दुःख सहन करावे लागले. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नी अतिशय जिद्दीने व मोठ्या धैर्याने आलेल्या दुःखाची व संकटांशी सामना करत होती. जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक संकटाला ती मोठ्या धैर्याने तोंड देत असे. व मोठ्या खंबीरपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे पदर कसूनउभी राहत असे. रमाबाई या अतिशय उच्च व सुसंस्कृत विचाराच्या होत्या. समजूतदारपणा ;कारुण्य; उदंड मानवता; व प्रेरणास्थान म्हणजे रमाई-असे मी अभिमानाने व स्वाभिमानाने सांगू इच्छितो.ज्ञानसाधना करणार्‍या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दुःखाची झळ पोहोचू दिली नाही. पती परदेशात शिक्षणासाठी गेल्यानंतर घर चालवण्यासाठी तिने गोवऱ्या थापल्या. सरपणासाठी त्या वन वन फिरत होत्या. बॅरिस्टरांची पत्नी शेण गोळा करते म्हणून लोक नाव ठेवतील. म्हणून रमाई रात्री आठ नंतर गोवऱ्या थापण्याचे काम करत असे. अतिशय कठीण अशा परिस्थितीतून त्यांनी आपला संसार प्रपंच उभा केला .परंतु बाबासाहेबांना कुठलेही प्रकारची झळ पोहचू दिले नाही ..बाबासाहेबांचे पाठीमागे त्या अतिशय खंबीरपणे उभे राहिल्या.. त्या काळामध्ये समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अस्पृश्यता निर्माण झालेली होती .याचे शल्य रमाबाईंना तर होतेच परंतु बाबासाहेब आंबेडकरांना देखील ही अशपृष्यातेची दरी टोचत राहिली होती. अस्पृश्यतेच्या अग्नी दिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करू लागले. अर्धपोटी उपाशी राहून18- 18 तास अभ्यास करू लागले. त्याचवेळी रमाईने आपले निष्ठेने त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे परदेशातून उच्च शिक्षण घेऊन मुंबईला परत आले .त्यावेळेला त्यांच्या स्वागतासाठी सर्व आंबेडकरी समाज मुंबईला बांद्राच्या मुंबई बंदरात येऊन थांबला होता. रमाईला नेसण्यासाठी चांगली साडी नव्हती .म्हणून त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सत्कार प्रसंगी दिलेला भर जरी फेटा नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी रमाबाई हजर राहिल्या. ते बोटीतून उतरताच अनेक जणांनी त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले. अनेक हितचिंतक बाबासाहेबांना भेटत होते. रमाई मात्र एका कोपऱ्यात शांतपणे उभ्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नजर त्यांच्यावर गेली ते रमाई जवळ गेले आणि म्हणाली रमा काय झाली आहे, तू अशी एकटीच कोपऱ्यात का उभी आहेस. !त्यावेळेस रमाईने खाली मान घातली.ते रमाईच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे डॉक्टर बाबासाहेबांच्या लक्षात आले . रमाबाईंनी २८ वर्षे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्तय येऊ नये म्हणून त्या तासनतास राजगृहाच्या बाहेर बसून राहत असे.रमाताई आंबेडकर या अतिशय गरीब परिस्थितीमध्ये वाढलेल्या होत्या .परंतु त्यांच्यावर संस्कार हे अतिशय चांगल्या प्रकारचे झालेले होते या संस्काररूपी माध्यमातूनच रमाबाईंनी बाबासाहेब आंबेडकरांना मोलाची साथ दिलेली आहे .खंबीरपणे ते त्यांच्या पाठीमागे उभे राहिल्या. त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ दिली नाही .अशी ही त्यांची पत्नी लाखात वेगळी अशीच म्हणावी लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक सुखा दुःखामध्ये त्या भाग घेत असत .हिरीरीने त्यांची चौकशी करत असे. कुठल्याही प्रकारची बाबासाहेबांना अडचण येणार नाही किंवा आपल्यामुळे बाबासाहेबांचे कोणतेही प्रकारचे काम नडणार नाही अशा प्रकारची ते स्वतः काळजी घेत असे. रमाबाई या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वरती जीव ओवाळून टाकत असे. गरीब परिस्थिती. अंगावर फाटकी वस्त्र त्यांनी घातली परंतु बाबासाहेबांकडे कधीही कोणती वस्तू घेण्यासंदर्भात हट्ट केला हट्ट केला नाही . समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा निर्माण झाली होती शिक्षणाचं कोणत्याही प्रकारचं तंत्र त्या काळामध्ये समाजाला माहित नव्हतं. रमाबाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघा पती-पत्नीमध्ये समाजातील अंधश्रद्धा व समाज शिक्षणापासून पारखा होत चाललेला आहे. या संदर्भातील सतत चर्चा होत असे .व त्या दृष्टीने दोघांचे प्रयत्न चालू होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते दूध पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे त्यांचे मत होते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणत असे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा महामंत्र त्यांनी संपूर्ण समाजाला दिला आहे. या अति महान अशा थोर रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी या ठिकाणी माझ्या सर्व तमाम बंधू भगिनींना नम्रपणे सूचित करू इच्छितो की खूप शिक्षण घ्या मोठे व्हा समाजसेवा करा आई-वडिलांची सेवा करा देशाची सेवा करा शिक्षणाने माणूस संस्कृत बनतो शिक्षणाचा उपयोग झाल्याशिवाय राहात नाही .डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असे म्हटले आहे की शिका म्हणजे खूप शिक्षण घ्या. संघटित व्हा म्हणजे विचार आणि एकत्रित या आणि संघर्ष करा म्हणजे तात्विक विचारांचा संघर्ष करा .आपले परखड विचार मांडण्याचा प्रयत्न करा. असा मोलाचा सल्ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे म्हणून शेवटी मला शिक्षणाच्या संदर्भात असे म्हणावे वाटते की घरोघरी लावा ज्ञानाचा दिवाशिकार तर टीकाल ज्ञान तेथे मानलाजू नका भिऊ नकाशिकायची संधी सोडू नका आधी विद्या दान मगच कन्यादान .. या महान आणि थोर अशा रमाबाई आंबेडकरांच्या बाबतीमध्ये मला अजून एक पंथी आठवली ती अशी की ^त्यागालाही वाटावी लाजअसा माई तुझा त्याग तुझ्या त्यागानेच निर्माण झाला आम्हा लेकरांचा अभिमान^शेवटी माझा सर्वांना प्रेम पूर्वक.🙏जयभीम🙏,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *