वडिलांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त २५ वृक्षांचे रोपण; माणिकखांब येथे अनोखा उपक्रम,आहे.

बातमी शेअर करा.

प्रतिनिधी: शिवनाथ घोटकर, घोटी बु. माणिकखांब सध्याची वाढती उष्णता आणि बदलणारे हवामान ही आपल्या सर्वांसमोरची एक गंभीर समस्या बनली आहे. यावर एकमेव आणि प्रभावी उपाय म्हणजे वृक्षारोपण. याच भावनेतून, सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत माणिकखांब (ता.इगतपुरी) येथे कालकथित सुरेश सोमनाथ थोरात यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त २५ वृक्षांचे रोपण करून त्यांना अनोखी व भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.”वृक्षारोपण हेच खरे स्मरण” हा संदेश देत, चिरंजीव संजय सुरेश थोरात यांच्या वतीने या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘एक मित्र एक वृक्ष’ या संकल्पनेवर आधारित या मोहिमेत गावातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

याप्रसंगी उपस्थित असलेले वृक्षप्रेमी व दारणा नदी सेवक बंटी पगारे, यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,”सध्याची भीषण उष्णता पाहता निसर्गाचे संतुलन राखणे अत्यंत गरजेचे झाले आहे. प्रत्येकाने केवळ झाडे लावून न थांबता त्यांचे मनापासून संगोपन करावे व ती जगवावीत. पर्यावरण संवर्धनासाठी हा एक छोटासा पण अत्यंत महत्त्वाचा प्रयत्न आहे.”या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी बौद्धाचार्य मनोजजी मोरे गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते एन. के. सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते भिमराव पंडित,यावेळी संजय सुरेश थोरात सर होते. बंटी पगारे, प्रतिक पगारे, चेतन पगारे, रुषभ पगारे, अनेक मान्यवर उपस्थित होते,

यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ आणि वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.”झाडे लावा, झाडे जगवा” आणि “पर्यावरण वाचवा – निसर्ग जपवा” असा मोलाचा संदेश देणाऱ्या या कौतुकास्पद उपक्रमाचे इगतपुरी तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *