
प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर, घोटी बु. माणिकखांब येथील ग्रामपंचायत निवडणूक २०२६ चे आरक्षण निश्चित करण्यासाठी आज, दिनांक १२ जून २०२६ रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
सभेच्या सुरुवातीला शासनाचे प्राधिकृत अधिकारी
श्री.आदित्य निरभवणे यांनी उपस्थितांना आरक्षण निश्चितीबाबतच्या शासकीय नियमावलीची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर सर्वांसमक्ष अत्यंत पारदर्शक आणि शासकीय नियमांनुसार आरक्षण निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.

अधिकारी व मान्यवरांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण आरक्षण सोडतीप्रसंगी शासकीय अधिकारी आणि गावातील प्रमुख आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये ग्राम महसूल अधिकारी श्री. मनोज वाकदकर, ग्राम अधिकारी श्री. नांद्रे, माजी सभापती श्री. विष्णुपंत चव्हाण, पोलीस पाटील उत्तमजी पगारे आणि ॲड. सोपानजी चव्हाण यांनी उपस्थित राहून निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण केले.
तसेच माजी सरपंच ज्ञानेश्वर भटाटे, माजी ग्रा.पं. सदस्य भोलेनाथ चव्हाण, माजी ग्रा.पं. सदस्य सुनील डी. पगारे, बाळासाहेब चव्हाण, दारणा माता सेवक बंटी पगारे, विक्रम गोपीनाथ पगारे, मच्छिंद्र चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, उत्तम दर्वे, नामदेव चव्हाण, मधुकर भटाटे, लालु लक्ष्मण चव्हाण, भगवान चव्हाण, लालु चव्हाण यांच्यासह गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
आरक्षणाची ही संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि नियमांनुसार पार पडल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, आता गावात निवडणूक वातावरणाला अधिक वेग आला आहे.
