प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर घोटी बु. दि.१५/०६/२०२६,उंबरकोन :स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण शाळा इमारत फुलांच्या माळा, आकर्षक रांगोळ्या, रंगीबेरंगी फुगे आणि तोरणांनी नटली होती.लेझीमचा ताल आणि बैलगाडीतून मिरवणूक इयत्ता पहिलीत नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुरड्यांची गावातून सजविलेल्या बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. लेझीम पथकाच्या तालबद्ध सादरीकरणाने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
शाळेत आगमन झाल्यानंतर नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करून, गुलाबपुष्प आणि कॅडबरी देऊन जंगी स्वागत करण्यात आले.
एक अनोखी आठवण… विद्यार्थ्यांच्या शाळेतील पहिल्या पावलांचे ठसे कागदावर घेऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची आनंददायी नोंद करण्यात आली. तसेच शाळेत उभारण्यात आलेल्या विशेष ‘सेल्फी पॉईंट’वर विद्यार्थी आणि पालकांनी फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती,
मोफत गणवेश व पाठ्यपुस्तक वितरण, पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली ते सातवीतील सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. परिपाठानंतर नियमित अध्यापनास सुरुवात झाली. दुपारच्या भोजनात विद्यार्थ्यांना स्वादिष्ट व्हेज पुलाव आणि मिष्ठान्नाचा विशेष बेत करण्यात आला होता. तसेच विविध मनोरंजक खेळांमुळे विद्यार्थ्यांचा पहिला दिवस अत्यंत आनंदी गेला.

मान्यवरांची उपस्थितीया, कार्यक्रमाला मा.श्री.किशोरजी सोनवणे, (राज्यकर सहाय्यक आयुक्त, वस्तू व सेवा कर विभाग, नाशिक) यांची विशेष उपस्थिती लाभली. शाळेचे मुख्याध्यापक श्री.राजेंद्र मोरकर सर, आणि उंबरकोन ग्रामपंचायत गावचे सरपंच श्री. आत्माराम सारुक्ते, उपसरपंच श्री. संजय सारुक्ते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. समाधान जगताप, सदस्य श्री. बाळू चिमटे, श्री. किरण शिंदे, श्री. भरत गहिरे आणि ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक श्री.राजेंद्र मोरकर सर, यांच्या प्रास्ताविकाने झाली, तर सूत्रसंचालन श्रीमती सुरेखा गुंजाळ.मॅडम, यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. चंदर कोरडे. सर , श्री. शिवराम मेमाणे. सर, श्री. वाळीबा पिचड. सर, श्री. पंढरीनाथ गोडे.सर , सौ. हेमलता मोरकर.मॅडम आणि सर्व शिक्षक वृंदाने विशेष परिश्रम घेतले. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात अत्यंत दणक्यात झाली .

