
प्रतिनिधी:-शिवनाथ घोटकर. इगतपुरी, नाशिक– राज्यव्यापी कलावंतांची एकमेव पोलादी संघटना असलेल्या अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती या कलावंत संघटनेच्या वतीने येत्या शनिवार दिनांक २३ मे २०२६ रोजी, वेळ दुपारी १ वाजता हुतात्मा स्मारक जिल्हाधिकारी कार्यालय समोर सीबीएस नाशिक या ठिकाणी अ. नगर / धुळे / जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील कलावंत /साहित्यिक / वारकरी (भजनी मंडळ) यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली असल्याचे माहितीपत्रक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुप्रसिद्ध गायक सोमनाथ गायकवाड यांनी प्रसिद्ध दिले आहे. सदर बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे, प्रामुख्याने, १) कलावंतांची नाशिक जिल्हा कार्यकारणी स्थापन करणे, २) संगमनेर या ठिकाणी विभागीय कलावंतांचा महाक्रांती मेळाव्याचे आयोजन करणे, ३) नाशिक विभागातील कलावंतांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित पडले आहेत त्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भव्य धरणे आंदोलनाची तयारी करणे… अशा अनेक महत्त्वाच्या मुद्यांवरती या बैठकीमध्ये प्रामुख्याने चर्चा करण्यात येणार आहे. तर धुळे / जळगाव /नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील कलावंतांनी व साहित्यिकांनी या बैठकीस आवर्जून उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने करण्यात आले,

