
प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर.घोटी बु, माणिकखांब (ता.इगतपुरी) येथे सोमवार, दिनांक १५ जून २०२६ रोजी ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथील जिल्हा परिषद शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे शाही स्वागत, मुलांना रिक्षात बसून गावातून काढलेली आकर्षक प्रभात फेरी, चिमुरड्यांच्या पावलांचे उमटलेले ठसे, मोफत गणवेश-पुस्तकांचे वाटप आणि वृक्षारोपणाचा पर्यावरणपूरक संदेश… अशा अत्यंत आनंददायी, चैतन्यमय आणि अभूतपूर्व वातावरणात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इयत्ता पहिलीत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यां चे रिक्षात बसून गावभर काढली प्रभात फेरी,
रिक्षा फेरीने वेधले गावकऱ्यांचे लक्ष, प्रवेशोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरली ती गावातून काढण्यात आलेली नवागत विद्यार्थ्यांची ‘रिक्षा वाहन प्रवेशोत्सव फेरी, या आगळ्यावेगळ्या फेरीद्वारे संपूर्ण गावात शिक्षणाचा संदेश देण्यात आला. शाळेत आगमन झाल्यावर इयत्ता पहिलीतील सर्व चिमुरड्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शाळेतील पहिल्या पावलांचे ठसे कागदावर उमटवून ती आठवण पालकांकडे सुपूर्द करण्यात आली, तसेच सर्व विद्यार्थ्यांचे सुंदर सेल्फी फोटोही काढण्यात आले.
मोफत गणवेश, शालेय साहित्य वाटप, विद्यार्थ्यांचा बहुमान, गावातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय मोफत गणवेश व पुस्तकांचे वाटप करण्यात आले. याच कार्यक्रमात इयत्ता पाचवीतील दोन पात्र विद्यार्थ्यांचा अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन विशेष बहुमान करण्यात आला. तृप्त करणारे मध्यान्ह भोजन’प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण आहार’ अंतर्गत पहिल्याच दिवशी नवागत व सर्व विद्यार्थ्यांना गरमागरम वरण-भात आणि गोड शिऱ्याचा सुग्रास बेत मध्यान्ह भोजनात देण्यात आला. मुलांनी या भोजनाचा मनसोक्त आस्वाद घेतला.
‘झाडे लावा, झाडे जगवा’ चा संदेश, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गावातील पालक आणि ग्रामस्थांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. “वृक्ष लावा झाडे जगवा, पर्यावरणाला वाचवूया, जागतिक तापमान कमी करूया,” असा मोलाचा संदेश या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला. ‘माणिकखांब गावाने विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. गावातील विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊ मोबाईल व टिव्ही बंद अभियानाची जनजागृती प्राध्यापक गोपाळजी लायरे.सर, सौ . मंगल गोपाळ लायरे.मॅडम,करत आहे, तसेच गावात दररोज संध्याकाळी ७:०० ते रात्री ८:३० या वेळेत ‘टीव्ही व मोबाईल मुक्त अभियान राबवले जात असल्याचा पुनरुच्चार याप्रसंगी करण्यात आला. पालकांनी या वेळेत मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
राज्य कर निरीक्षकांकडून शालेय कामकाजाचे कौतुक, या सोहळ्याला राज्य कर निरीक्षक श्री. कुणाल रमेश साबळे.साहेब, यांनी सदिच्छा भेट दिली. शाळेतील सर्व नावीन्यपूर्ण उपक्रम, नियोजनबद्ध आयोजन आणि डिजिटल काळातील उत्तम शालेय कामकाज पाहून त्यांनी कमालीचे समाधान व्यक्त करत शिक्षक वृंदाचे भरभरून कौतुक केले. मान्यवर व ग्रामस्थांची अलोट उपस्थिती, या सोहळ्याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ निवृत्ती चव्हाण, शिवाजी भटाटे, रवींद्र माळी, पोलीस पाटील उत्तम शिवराम पगारे, ॲड. सोपान चव्हाण, मनसेचे इगतपुरी तालुका उपाध्यक्ष भोलेनाथ चव्हाण, लक्ष्मणदादा चव्हाण पाटील, माणिकखांब आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. क्षीरसागर मॅडम, आरोग्य सेविका श्रीमती डगळे.मॅडम, डॉ.परदेशी सर, आशा सेविका, लोकराज्य प्राईम न्यूजचे संपादक सुनील धर्माजी पगारे, हिरामण चव्हाण, विजय चव्हाण, वृक्षप्रेमी बंटी पगारे, उल्हास पगारे, वसंतराव चव्हाण, उत्तम दर्वे, भगवान भटाटे, भावराज चव्हाण, सोपनाथ भटाटे, किशोर भटाटे, सिद्धार्थ पगारे, सोनू चव्हाण, चांगदेव आडोळे यांच्यासह गावातील अनेक पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक वृंदाचे विशेष परिश्रमहा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.विजयकुमार सोमनाथ येशी.सर, यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक वृंदाने विशेष परिश्रम घेतले:श्री.दामोदर केदु बच्छाव .सर,श्री. कैलास यादव शिंदे .सर,श्री. महेंद्र प्रभाकर हिरे.सर,श्री. सोमनाथ अशोक सोनवणे.सर.श्रीमती संगीता रमेश अहिरे.मॅडम, श्रीमती प्रतिभा नारायण करसाळे .मॅडम, श्रीमती संगीता दादाजी पवार .मॅडम, श्रीमती कविता दौलत वाजे.मॅडम, श्रीमती ललिता सदाशिव सोनवणे.मॅडम, श्रीमती हर्षाली चुनीलाल बहिरम. मॅडम, शाळेतील सर्व उपक्रम अत्यंत आनंददायी वातावरणात पार पडल्याने पालकांनी व ग्रामस्थांनी शाळा प्रशासनाचे व सर्व शिक्षकांचे विशेष आभार मानले,
