मकर संक्रांत हा परस्परातील स्नेह वृद्धिंगत करणारा सण.

बातमी शेअर करा.

मकर संक्रांत हा सण भारतातील एक फार मोठा सण असून तो निसर्ग परिवर्तनाचा मोठा भाग असल्यामुळें हा सण दरवर्षी 14 जानेवारी या दिवशी मोठ्या प्रमाणात जगभर साजरा केला जातो.नवीन पीक;निसर्गाच्या चक्रात बदल होत असतो आणि परस्परातील स्नेहभाव व मानावतेचा संदेश घेऊन येत असतोत्याचं प्रमाणे ऐतीहाशिक आणि सांस्कृतीक असे महत्व या सणाला प्राप्त झाले आहे….. मकर संक्रांत हा सण शेतकऱ्यांसाठी खुप महत्वाचा सण असुन या सणाला धार्मिक आणि सामाजिक महत्व प्राप्त झाले आहे.मकर संक्रांत हा सण भारतातील पौष महिन्यात एक शे संबंधित सण आहे. आणि म्हणूनच या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यामध्ये तयार झालेल्या धान्याचे वाण महिला एकमेकांना देत असतात.ऊस; हरबरे; बोरे; गव्हाची ओंबी; तीळ; इ. पदार्थ सुगडात भरून देवाला अर्पण करतात. संक्रांत या सणाच्या बाबतींत एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपली काल गणना ही चंद्रावर आधारित आहे असे आपण मानतो. परंतु ती सूर्याचे परिभ्रमण यावर अवलंबून असते.त्या मुळे सौर कालगणनेशी संबंधित असा हा सुर्याच्या उत्तरायनाशी जोडलेला महत्वाचा असा हा एक भारतीयांचा फार मोठा सण असून तो दरवर्षी 14 जानेवारी या दिवशी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.मकर संक्रांतीचे आदल्या दिवशी भोगी हा सण संपूर्ण भारत भर साजरा केला जातो..मात्र या सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. पंजाब मध्ये हा सण , लोहीरी या नावाने ओळखला जातो. या दिवशी तीळ लावलेलीबाजरीची भाकरी ;खर्डा; सर्व सेंग भाज्या; पावट्याचे दाणे;वांगी; बटाटा अश्या सर्व प्रकारच्या भाज्यांची मिक्स भाजी करून मोठ्या आनंदाने सेवन करतात. मकर संक्रांतीचे दिवशी महीला एकत्र येऊन एकमेकींना हळदी- कुंकू लावतात. आणि विवीध वस्तूंचे वाण देण्याची प्रथा देखील आहे. एकमेकांना तिळगूळ वाटतात. एकंदरीत मकर संक्रांत हा सण भारतातील एक फार मोठा सण असून तो दरवर्षी प्रमाणे 14 जानेवारी या दिवशी मोठ्या प्रमाणात जगभर साजरा केला जातो..थोडक्यात=तिळगुळ घ्या आणि गोड बोला^ असे म्हटले जाते याचा अर्थ असा की आपापसातील मतभेद बाजूला सारून या दिवसापासून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन नविन वर्षात नवीन संकल्प केला जातो. या मकर संक्रांत सणाचे निमित्ताने मी माझ्या सर्व मित्र व बंधू आणि भगिनींना नम्र पने सूचित करू इच्छितो की. आपल्यात आपापसातील जे काही मतभेद असतील; काही हेवे दावे किंवा पूर्ववैमनश्य असेल ते सर्व काही या सणाच्या दिवशी विसरून जावे. व आपापसात स्नेह वृद्धिंगत करण्याचा उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन एकमेका साह्यकरू अवघे धरू सुपंथ या उक्ती प्रमाणे आचरण करावे. . …… तीळ- गूळ घ्या आणि गोड गोड बोला.

मा.प्रा.ज्ञानेश्वर बनसोडे सर. साकुरी.ता.रहाता.जिल्हा.अहिल्या नगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *