अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे वर्धापन दिन साजरा,

बातमी शेअर करा.

प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर, इगतपुरी,

अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सप्रसिद्ध गायक सोमनाथजी गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय कलावतं न्याय हक्क समिती या शाखेची अधिकृत स्थापना दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी झाली. तरी या शाखेचा ३ रा वर्धापन दिन सोहळा दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात साजरा झाला. या सोहळ्याला गावातील समस्त नागरीक कलावंत जागरण गोंधळी, किर्तन‌कार, प्रवचनकार, संभळवादक, आदि कलाकार उपस्थीत होते. हा वर्धापन सोहळा अगदी उत्साहात पार पडला. अखिल भारतीय कलावंत न्याय हक समितीचे देवळा तालुका अध्यक्ष श्री रमण (बापू) ठाकरे, व देवळा ता. उपाध्यक्ष श्री.दगु केदारे तसेच अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती कुंभार्डे शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थीत होते.अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती देवळा ता अध्यक्ष श्री. रमण (बापू) ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना कलाकारांना एकत्रिक येन्याचे आव्हान केले. आपल्या भागात जास्तीत जास्त कलाकार निर्मान झाले पाहिजेत.. कुंभार्डे शाखेचे सरचिटनीस श्री. नारायण देरेकर यांनी कलावंताचे गावातील ग्रामस्थांचे आभार मानून अखिल भारतीय कलावंत समितीचा विजय असो अश्या जयकाराने कार्यक्र‌माची सांगत केली.

जयहिंद जय कलाकार,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *