माणिकखांब येथे चव्हाण परिवार ने अंत्यविधी नंतर निर्माण होणारी राख नदीत न टाकता खड्यात टाकुन केले वृक्षारोपण,

बातमी शेअर करा.

प्रतिनिधी :-शिवनाथ घोटकर, घोटी.इगतपुरी,

आज दि.२८/०३/२०२६,रोजी, माणिकखांब गावचे ह.भ प बंडू नारायण चव्हाण, यांचे चिरंजीव व ॲडः- सोपान बंडू चव्हाण यांचे मोठे भाऊ कै. संजय बंडू चव्हाण यांच्या राखेच्या कार्यक्रम निमित्त नियमाप्रमाणे थोडी राख नदी मध्ये टाकण्यात आली उरलेली जी राख होती ती राख नदीमध्ये न टाकता घरी आणून एक वृक्ष लावण्यात आले, मृत व्यक्ती ची दहन केल्या नंतर त्यांची रक्षा (राख) ही नदी च्या पाण्यात विसर्जित न करता चव्हाण, परिवार ने वृक्षारोपण करून राख त्या झाडाच्या रोपणासाठी खोदलेल्या खड्या मध्ये टाकुन, मृत व्यक्तीच्या राखेतून वृक्षसंवर्धन करून भावाची आठवण कायमस्वरूपी जपता यावी या उद्देशाने चव्हाण परिवार ने घेतलेल्या निर्णयांची व पर्यावरण पुरक व स्तुत्य उपक्रम ची सर्वच समाजातुन कौतुक होत आहे, परिवाराने घेतलेल्या निर्णया चा सर्व समाजाने आदर्श घ्यावा आपण बघितले तर नदी प्रदूषित होण्यासाठी आपणच कारणीभूत आहोत नदी प्रदूषित होऊ नये म्हणून परिवाराने अंत्यविधी नंतर निर्माण झालेली राख जुन्या परंपरेल अनुसरून व भावनेपोटी मुठभर राख नदीत टाकून उर्वरित राख नदीत न टाकता, वृक्षारोपणाच्या खड्यात टाकुन वृक्षारोपण करून वृक्षाच्या रुपाने आपल्या भावाची आठवण कायमस्वरूपी जिवित ठेवुन खर तर नश्वर देहाची मुक्ती यातुन साधली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, भविष्यात पुढच्या पिढी करीता ह्या वृक्षांच्या माध्यमातून भावाच्या आठवणीस उजाळा देत राहील. सोबतच आंबा व इतर वृक्षापासुन अनेकांना सावली ये वृक्ष देईल सर्व समाजाने आदर्श घ्यावा असे कार्य आज चव्हाण परिवाराने केले यावेळी उपस्थित, परिवारातीलआई-मैना बाई बंडू चव्हाण, मुलगी-सुवर्ण लायरे,मंगल गतिर,भाऊ ,गोरख चव्हाण,मिनींनाथ,तुकेश ,ज्ञानेश्वर,मोहन,संदीप ,रोहिदास,गणेशपुतण्या,विकीचुलते,रतन जी चव्हाण, आदि उपस्थित सर्व गावातील ग्रामस्थ झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा,असा संदेश सर्व नागरिकांना देत, कै.संजय बंडू चव्हाण, यानां नातेवाईक आणि परिवारात सर्वानी भावपूर्ण श्रध्दांजली,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *