दिनांक सात फेब्रुवारी हा अतिशय आनंदाचा दिवस तमाम भारतीयांची माता, मातोश्री रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती संपूर्ण शहर तालुका गाव खेड्यात महाराष्ट्रभरच नव्हे भारतभर साजरी होत असताना, इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात सर्व तीर्थ टाकेद येथे न्यू इंग्लिश स्कूल या नावाजलेल्या शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम साबळे. व त्यांचे सहकारी शिक्षक यांच्या पोटात आणि पोटात बरच काही शिजत होतं इयत्ता सहावी शिकत असलेल्या विद्यार्थिनीला सहशिक्षकाच्या मदतीने घरी बोलावून अत्याचार केला. असं माणुसकीला काळिंबा फासणार दुष्कृत्य करून गुरुपरंपरेला न शोभणार कृत्य केलं अशा नराधम गुन्हेगारांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून पीडित विद्यार्थिनीला न्याय द्यावा तसेच हा खटला जलद गती न्यायालय चालून गुन्हेगाराला फाशी देण्यात यावी थोड्या दिवसात दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे अशा दुर्घटनेचा परीक्षा केंद्रावर आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक ताण तणाव व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा याकरता प्रशासनाने कॉफी बहाद्दर कॉफी पुरवणारी, किंवा परीक्षा केंद्र परिसरात दहशत पसरवणारे बेजबाबदार व्यक्तींना शाळा प्रशासन शासन त्या त्या भागातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस प्रशासन यांनी सहकार्य करून परीक्षा निर्भय वातावरणात कशा पार पडतील ही काळजी घ्यावी
. प्रवक्ता.
वंचित बहुजन आघाडी.
नंदू भाऊ पगारे धामणीकर
