इगतपुरी प्रतिनिधी,
महाराष्ट्र राज्य महायुती सरकार मधील शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांना इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब, नांदगाव सदो व तळोघ जिल्हा परिषद शाळा साठी तसेच वाचानलय साठी नविन इमारत बांधकाम मंजूर होण्याबाबत निवेदन देऊन मागणी करण्यात आली. यावेळी नामदार साहेबांनी पण सकारात्मक शब्द दिला. तसेच साहेबांना निवेदना मध्ये म्हटलं आहे की, शिक्षण मोफत दया कारण मोफत शिक्षण देणे हि काळाजी गरज आहे. तसेच इंग्लीश मिडियम कडे जी पालकांची ओढ आहे. ती कमी होईल. आजच्या महागाईच्या जिवनात इंग्लीश मिडीयमला प्रत्येकाला शिक्षण घेणे शक्य नाही. त्यामुळे तुम्ही नविन इमारती साठी निधी उपलब्ध करून दया. म्हणजे मराठी जि. प. शाळा चा दर्जा उंचावेल आणि मराठी शाळा जिवंत राहतील. अशा अनेक मागणी पत्रात देऊन करण्यात आली.
हे निवेदन इगतपुरी येथील शासकीय विश्रामगृहात माणिकखांब गांवचे माजी सरपंच हरीष चव्हाण, शिवसेना उप जि. प्रमुख सदानंद नवले, शिवसेना युवा ता. प्रमुख विनोद भागडे , भुषण जाधव, मदन कडु आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.
