नाशिक (प्रतिनिधी)
आज दिनांक 17/2/2025 सोमवार रोजी भिमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक विभागाचे महसूल अप्पर आयुक्त श्री.सुभाषजी बोरकर यांची भेट घेऊन निवेदन दिले..निवेदनाचा आशय असा आहे की घोडदरी ता.भोर जि.पुणे येथे नुकतेच विक्रम गायकवाड या बौद्ध युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे सदर गुन्हा हा ऑनर किलिंग च्या अनुषंगाने घडलेला असल्याने त्या दिशेने तपास व्हावा व यासाठी स्थानिक पोलिसांचे काम समाधानकारक नसल्याने पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक अर्थात एस आय टी ची स्थापना करून हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून दोषींना कडक शिक्षा करावी तसेच सदर गुन्हा हा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये नोंदवला गेला असल्याने यातील फिर्यादी कुटुंबीयांना देण्यात येणारी सरकारी मदत तात्काळ द्यावी अन्यथा राज्यभर आंदोलन उभारू असे गांगुर्डे यांनी सांगितले.
याप्रसंगी भिमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे , राज्य नेते विकीभाई भोळे , जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर बहाळकर, शहराध्यक्ष सुरेशजी जाधव, जयेश नांगरे, सोनालीताई केदारे, नाना गोडबोले, युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
