नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व येवला तालुक्यातील विद्यार्थिनींनी बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून आपल्या गावाचा आणि कुटुंबाचा अभिमान वाढवला आहे.
इगतपुरी तालुक्यातील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धन कॉलेज मधील कु. पूर्वा रोहिदास रुपवते हिने विज्ञान शाखेत ६८% गुण मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत आपल्या महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक पटकावला. तिचे वडील श्री. रोहिदास उत्तम रुपवते व आई सौ. मनिषा रुपवते तसेच उत्तम कचरु रुपवते गुरुजी रा. आंबेडकर नगर घोटी बु. यांची नात असून यांचे मार्गदर्शन तिच्या यशामागे मोलाचे ठरले आहे.
तर दुसरीकडे येवला तालुक्यातील स्वामी मुक्तानंद उच्च माध्यमिक विद्यालय ची विद्यार्थिनी कु. स्नेहा राजू मैले हिने कला शाखेत ९१.५०% गुण मिळवून नाशिक जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, तिने संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिचे वडील राजू मोहन मैले हे शिक्षक असून, आई शालिनी मैले गृहिणी आहेत.
या दोघी विद्यार्थिनींचे त्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून, भविष्यात त्या आपल्या ज्ञानाने समाजाला नवे दिशा देतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
