घोटी बुद्रुकला नगरपरिषद दर्जा मिळावा!; भाजपने मुख्यमंत्र्यांकडे केली ठाम मागणी – ऐतिहासिक दस्तऐवजांसह सादर केले निवेदन

Oplus_0

बातमी शेअर करा.

इगतपुरी तालुक्यातील घोटी बुद्रुक शहराला नगरपरिषद किंवा नगरपालिकेचा दर्जा मिळावा, अशी ठाम मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब डोंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. घोटीची लोकसंख्या २५ हजारांच्या पुढे गेली असून, भौगोलिक आणि सामाजिकदृष्ट्या शहराची झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नगरपरिषद दर्जा आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ही मागणी नवी नसून सन २०१७ मध्ये तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांना यासाठी पत्र दिले होते. त्याआधी २००८ मध्ये माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे लक्षवेधी सूचनेद्वारे हीच मागणी मांडली होती.

त्याकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी आणि नगररचना विभागाला प्रस्तावित नगरपालिकेच्या नकाशासह अकृषक रोजगाराच्या टक्केवारीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.निवेदनासोबत जोडलेले महत्त्वाचे दस्तऐवज:२०१७ मधील घोटी ग्रामपालिकेच्या मागणीचे पत्र,२००९ मधील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे पत्र,नगरविकास मंत्री राजेश टोपे व विलासराव देशमुख यांचे पत्र,२०१४ मधील ग्रामपंचायतचे विवाह व जन्मनोंद पत्र,२०११ ची जनगणना व २०१४ मधील तलाठ्याचा स्वयंरोजगार अहवाल,गाव नमुना १ चा गोषवारा व घोटी बुद्रुक-सामान्य प्रवर्ग व घोटी खुर्द-आदिवासी योजना उल्लेख.

या वेळी भाजप जिल्हा प्रमुख सुनील बच्छाव, जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब डोंगरे, घोटी शहर प्रमुख प्रफुल्ल शेठ कुमट, जगन भगत, कैलास कस्तुरे, भारत दोडके, योगेश सोनवणे, दीपा राय, पल्लवी शिंदे, प्रतिभा काळे, सीमा झोले, राजेंद्र काटकाळे, अरुण शेलार, सय्यद रंगरेज, कैलास लोटे, मुन्ना शेख, कैलास भोर, अशोक काळे, प्रफुल्ल कुमट, प्रकाश सोनवणे, बाळासाहेब सुराणा, मोहन भगत, मंदाताई भोईर, सुनिता सिंगल, मोहन बबरावाल, रवींद्र गव्हाणे, हेमंत बेंडकुळे, सचिन गोणके इत्यादींची उपस्थिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *