नाशिक (प्रतिनिधी) –दिंडोरी रोडवरील निसर्ग नगर परिसरात गुरू गोरक्षनाथ सेवा संस्थानच्या वतीने एक भव्य व भक्तिभावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये हजारो भाविकांनी सहभाग घेत अध्यात्मिक आणि सांस्कृतिक अनुभूती घेतली.
कार्यक्रमाची सुरुवात परम श्रद्धेय कौशल नाथ महाराज यांच्या अमृततुल्य प्रवचनाने झाली. त्यांनी गुरूचे जीवनातील महत्त्व आणि जीवनाचा सार सोप्या भाषेत स्पष्ट केला. त्यांच्या प्रवचनाने भाविकांना आत्मिक समाधान दिले.
यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत गुरू गोरक्षनाथांची महाआरती उत्साहात पार पडली. याच वेळी बालगोपालांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण मंत्रमुग्ध झाले. भाविकांना गुरू गोरक्षनाथ मूर्तीवर अभिषेक व दर्शन घेण्याची संधी मिळाली, तसेच गुरू कौशल नाथ महाराज यांच्याही दर्शनाचा लाभ मिळाला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे:सुनील केदार,सुनिल निरगुडे,अमित घुगे,केदार जानोरकर,योगिता चौधरी, जेमिनी देसाई कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खालील सेवेकऱ्यांचे विशेष योगदान लाभले: जगदीश बागडे,प्रभाकर सांगळे,राकेश सांगळे,हर्षल पवार,भूषण पवार,धनराज खांडबहाले,प्रशांत जंगम,राकेश देशमुख,ऋषिकेश आहेर,मुकुंद नवले,प्रशांत भावसार,दिनेश चौधरी,दीपक ढोक बिरारी आदी उपस्थित होते.
गुरू गोरक्षनाथ सेवा संस्थानच्या या पवित्र उपक्रमाने परिसरात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली असून, अशाच कार्यक्रमांची भाविक आतुरतेने वाट पाहत आहेत.
