विल्होळी आठव्या मैलावर मोटरसायकल अपघात : दोन जण गंभीर जखमी, नरेंद्राचार्य संस्थानाच्या रुग्णवाहिकेने तत्काळ मदत

बातमी शेअर करा.

नाशिक | १२ जुलै २०२५नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर आज सकाळी ७.३० वाजता गोंदे फाटा जवळील आठव्या मैलावर एक भीषण अपघात घडला. मुंबईहून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी MH.15.JG.6540 क्रमांकाची मोटरसायकल अनियंत्रित होऊन घसरली. यामध्ये मोटरसायकलवरील दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातात अनिल राम प्यारे सहाशे, वय २६ आणि छोटेलाल कौल, वय ३९ अशी जखमी झालेल्यांची नावे असून मिळालेल्या माहितीनुसार, मोटरसायकल चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हे वाहन रस्त्यावरच घसरले आणि जोरात आपटल्याने ही दुर्घटना घडली.

अपघात घडताच जवळच असलेल्या जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थान यांच्या गोंदे फाटा येथील मोफत ॲम्बुलन्स सेवा तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. तातडीने दोघांनाही उपचारासाठी नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *