घोटी (दि. १३ जुलै २०२५):भारतीय बौद्ध महासभा घोटी शहर शाखेच्या अध्यक्षा वंदनाताई रुपवते यांच्या अध्यक्षतेखाली महिला कार्यकारिणीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्यांच्या वर्षावास प्रवचन मालिकेतील दुसरे पुष्प मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडले. हा कार्यक्रम रविवार, दिनांक १३ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ वाजता नालंदा बुद्धविहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, घोटी शहर येथे आयोजित करण्यात आला होता.
प्रवचनाचा विषय: भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन – “विशुद्धी मार्ग”🟢 प्रवचनकार: आयु. एन. बी. पगारे गुरुजी (केंद्रीय शिक्षक, माजी जिल्हाध्यक्ष नाशिक पश्चिम)ज्यांनी या विषयावर गहन आणि प्रेरणादायी मार्गदर्शन करून उपस्थितांना धम्मानुभूती दिली. कार्यक्रमाची सुरुवात बौद्धाचार्य आयु प्रभाकर चिकणे गुरुजी यांच्या त्रिसरण, पंचशील, बुद्धपूजा व भीम स्तुतीने करण्यात आली. आयुनी. रेणुकाताई रूपवते, आयुनी. जानवीताई रूपवते (पवार), आयुनी. रोहिणीताई (सुषमा) रूपवते यांच्या हस्ते पुष्पपूजा, दीपधूप पूजन करण्यात आले. सूत्रसंचालनाचे कामकाज आयुनी. सुनिताताई भोले (संघटक, घोटी शहर) यांनी अतिशय प्रभावी पद्धतीने पार पाडले. प्रवचनानंतर आयु. एन. बी. पगारे गुरुजी यांचा महिला विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमानंतर धम्मदान करण्यात आले व उपस्थितांना अल्पोपहार देऊन दान पारमिता पार पाडण्यात आली. आयुनी. जानवीताई रूपवते (पवार) (BRSP महाराष्ट्र प्रदेश सचिव) यांनी सर्व उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत व आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाला आयु. एन. बी. पगारे गुरुजी (केंद्रीय शिक्षक),आयु. वि. म. रूपवते गुरुजी (मा. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य),आयुनी. वंदनाताई रूपवते (अध्यक्ष, घोटी शहर),आयुनी. चंद्रभागाताई रूपवते (केंद्रीय शिक्षिका, घोटी),आयु. प्रभाकर चिकणे गुरुजी (बौद्धाचार्य),आयु. चंद्रकांत रूपवते (विहार कमिटी अध्यक्ष),आयु. गोपाल दिवेकर (मा. श्रामनेर),आयु. राहुल शिंदे गुरुजी (बौद्धाचार्य),आयु.अनिकेत उबाळे गुरुजी (बौद्धाचार्य) आदी मान्यवरांची उपस्थिती होती.तसेच आयुनी. कोमलताई रूपवते (सरचिटणीस, घोटी शहर), आयुनी. मथुराताई कोळे (उपाध्यक्ष, संस्कार घोटी शहर), आयुनी. रमाताई पटेकर (संस्कार सचिव, घोटी शहर), आयुनी. कल्पनाताई रूपवते (संरक्षण उपाध्यक्ष, घोटी शहर), आयुनी. सुनिताताई भोले, लंकाताई भोले, ललिताताई भोले (संघटक, घोटी शहर),आयुनी. जयश्रीताई रूपवते, जानवीताई रुपवते, रोहिणीताई रूपवते, रेणुकाबाई रूपवते,राधाबाई रूपवते, लीलाबाई रूपवते , रत्नाताई रूपवते, सुनिताताई रूपवते, दिपालिताई रूपवते, पुष्पाताई रूपवते,चंद्रकलाताई रूपवते,आयुनी. शिताबाई रोकडे, रंजनाताई रूपवते, रुपालीताई पठारे आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
