नाशिक: अंधत्वावर मात करत यशाच्या शिखरावर पोहोचलेला यशराज अरुण शिंदे हा अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथील रहिवासी विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत ९२.२०% गुण मिळवत के.जे. मेहता हायस्कूल, नाशिक रोडमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे यशराज अंध असूनही त्याने आपल्या जिद्दीने व अभ्यासातून विशेष प्राविण्य प्राप्त केलं आहे.
यशराजने पहिली ते दहावी पर्यंत शिक्षणाच्या कालावधीत होस्टेलमध्ये राहून शिक्षण घेतले. सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अरुण प्रभाकर शिंदे यांचा तो मुलगा आहे. यशराजची ही कामगिरी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरते आहे.दृढ निश्चय, अथक प्रयत्न आणि पालकांचे व मार्गदर्शकांचे सहकार्य यामुळे यशराजने हे यश संपादन केलं असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
