हरीश तूपलोंढे ( प्रतिनिधी)
महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेझे गावाजवळील चाकोरे चक्रतीर्थ येथे शाहीपर्वस्नान चे आयोजन करण्यात आले आहे. श्री राम शक्तीपीठ संस्थान चाकोरे मार्फत नियोजन करण्यात येत आहे या अनुषंगाने अति प्राचीन कुंभमेळा स्थान चाकोरे चक्र तीर्थ श्रीराम शक्तीपीठ संस्थान पीठाधीश्वर श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांचे प्रयोजन प्रत्येक महाशिवरात्री निमित्त करण्यात येते . या कार्यक्रमाचे निमंत्रण अन्य औषध प्रशासन मंत्री मा. नरहरी झिरवळ साहेब व आमदार मा. हिरामण खोसकर साहेब यांना भेटून देण्यात आले . त्याचप्रमाणे सर्व भाविकांना शाही पर्वस्नानात उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजित बेझे चाकोरे ग्रामस्थ मंडळ व श्रीराम शक्तीपीठ संस्था मार्फत करण्यात आले.
