माणिकखांब शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांचे मनोगत, नृत्य, आणि सन्मान सोहळ्याने कार्यक्रम उजळला

बातमी शेअर करा.

माणिकखांब (ता. इगतपुरी) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माणिकखांब येथे भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र मोरकर सर यांनी भूषवले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि संविधान पूजनाने करण्यात आली. यानंतर इयत्ता १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत प्रभावीपणे व्यक्त केले.

स्मिथ लायरे, सिद्धी चव्हाण, अनुष्का गीते, अनिरुद्ध पगारे, प्रणाली चव्हाण, हर्षदा चव्हाण, प्रबोधी गांगुर्डे, रिद्धी भटाटे, श्रावणी भटाटे, संचिता लायरे, स्वरा चव्हाण, विराज पगारे, साक्षी पगारे, अतुल चव्हाण, श्रृती नेटावटे, बंटी पगारे, संपादक सुनिल डी. पगारे यांनी मनापासून विचार मांडले.यानंतर आराध्या चव्हाण, अर्चना आडोळे, प्रतिभा लायरे, आर्या मोरे, प्रबोधी गांगुर्डे, आणि श्रृती नेटावटे यांनी सामाजिक संदेश देणारे सुंदर नृत्य सादर केले.हुंडई मोटार कंपनीच्या वतीने राबविण्यात आलेल्या डिजिटल वित्तीय साक्षरता मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच माणिकखांबचे पोलीस पाटील श्री. उत्तम पगारे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना वह्या-पेन वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास लोकराज्य प्राईम न्यूज चे संपादक सुनिल डी. पगारे, बंटी पगारे दारणा माता सेवक, सिद्धार्थ फाउंडेशनचे उपाध्यक्ष दिनकर पगारे, पंकज पगारे, ह.भ.प. बंडु नारायण चव्हाण, आणि महिलावर्गातून चंद्रकला पगारे, रत्ना पगारे, सुनिता पगारे, ज्योती गांगुर्डे, जयश्री पगारे यांची उपस्थिती लाभली.शिक्षकवृंदामधून दामोदर बच्छाव, पुंजाराम हिरे, सोमनाथ सोनवणे, संगीता पवार, सरला देवरे, संगीता अहिरे, ललिता सोनवणे, संगिता हिरे, प्रतिभा करसाळे, कविता वाजे, हर्षाला बहिरम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्रमुख भाषणात मुख्याध्यापक श्री. मोरकर सरांनी विद्यार्थ्यांना परिस्थितीचे कारण देऊन शिक्षण थांबवू नये, तर बाबासाहेबांचे आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शिक्षण घेत राहावे, असा मोलाचा संदेश दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *