हरीश तूपलोंढे (त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी)
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत, त्र्यंबकेश्वर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकाची स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई येथील अधिकाऱ्यांच्या पथकाने तपासणी केली.
या प्रसंगी स्थानक परिसरात आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून पाहणी पथकाचे स्वागत करण्यात आले. बसस्थानकाच्या नूतन वास्तूत चालक-वाहक विश्रांती गृह, हिरकणी कक्ष, फलटावरील आसने, स्थानक प्रमुख कक्ष, विद्यार्थी पास व आरक्षण कक्ष, मोकळ्या पटांगण आणि प्रवाशांसाठी उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची सखोल पाहणी करण्यात आली.
या पथकामध्ये श्रीमती यामिनी जोशी (प्रादेशिक महाव्यवस्थापक, कोकण प्रदेश), श्री विवेक लोंढे (प्रादेशिक अभियंता, कोकण प्रदेश), श्री किरण भोसले (विभागीय वाहतूक अधिकारी, नाशिक) यांचा समावेश होता.
स्वच्छता मोहिमेचे यशस्वी नेतृत्व श्री बिरारी (आगार व्यवस्थापक), श्री गणोरे (सहाय्यक वाहतूक अधीक्षक), श्री हाडोळे (वाहतूक निरीक्षक), व रावत मॅडम (सहाय्यक वाहतूक निरीक्षक) यांनी केले. वाहतूक नियंत्रण विभागाच्या वेळोवेळी राबवलेल्या स्वच्छता उपक्रमांमुळे पथकाने समाधान व्यक्त करून सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.या वेळी श्री अशोक बोंबले, श्री एन.व्ही. माळी, श्री दत्तात्रय भोये, श्री अमेय भोसले, श्री अमोल रावते, श्री सुभाष सानप, आणि श्री महाजन हे वाहतूक नियंत्रक देखील उपस्थित होते.त्र्यंबकेश्वर बसस्थानकाने स्वच्छतेच्या बाबतीत एक नवा आदर्श उभारल्याची भावना या उपक्रमातून प्रकर्षाने दिसून आली.
