निलेश चव्हाण (सातपूर प्रतिनिधी)
भारतीय जवानांचे मनोबल उंचावावे आणि देशाच्या एकतेचे प्रतीक म्हणून नाशिकमधील भारतप्रेमी वकील बांधवांच्या वतीने एक भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत नाशिकचे माजी सैनिक आणि त्यांच्या वीरपत्नींचा विशेष सहभाग होता.
यात्रेच्या निमित्ताने देशाच्या सीमांवर लढणाऱ्या आणि शहीद झालेल्या जवानांना अभिवादन करण्यात आले. वकिलांच्या या उपक्रमामध्ये ऍडव्होकेट शलाका पाटील, ऍडव्होकेट हर्षल पुराणिक, ऍडव्होकेट मिलिंद कुरकुटे, ऍडव्होकेट भूषण जाजू यांच्यासह अनेक तरुण वकील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या राष्ट्रभक्तिपूर्ण उपक्रमातून नाशिकमधील कायदा क्षेत्रातील लोकांनी देशप्रेमाची प्रखर भावना व्यक्त करत भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त केला.
