कोजुली अंगणवाडी केंद्रास UNICEF टीमची भेट

बातमी शेअर करा.

पांडुरंग दोंदे, तालुका प्रतिनिधी

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प त्र्यंबकेश्वर अंतर्गत सामुंडी विभागातील कोजुली अंगणवाडी केंद्रास UNICEF टीम ने EDNF व ARF based VCDC स भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. ० -६ महिने वयोगटातील माता, ANM,अंगणवाडी ताई, आशा, पर्यवेक्षिका यांच्याशी संवाद साधला. सामुंडी येथे आरंभ अंतर्गत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यास युनिसेफ चे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय अधिकारी
मा. मेरी क्लाऊड मॅम(Chief of Nutrition, UNICEF, Delhi),
मा. संजय सिंग सर(CFO, UNICEF, Delhi),
मा. राजलक्ष्मी नायर मॅम(Nutrition Specialist, UNICEF, Maharashtra)
मा. समीर पवार सर(Nutrition Officer, UNICEF, Delhi)
मा. डॉ. संजय प्रभू सर(Sr. Pediatrician-Delhi, Wadia Hospital, Mumbai UNICEF, Mumbai),
व्योमा मॅम(Nutrition Officer ,UNICEF, Mumbai),
नितीन वसईकर सर(Divisional Co-Ordinator , UNICEF)
महिला व बालकल्याण चे जिल्हाकार्यक्रम अधिकारी मा. प्रताप पाटील सर, BDO मा. गजानन लेंडी सर, CDPO मा.भारती गेजगे मॅम, सरपंच मा. अशोक गवारी सर, विस्तार अधिकारी . शिलावट भाऊसाहेब, पर्यवेक्षिका सुरेखा सोनवणे मॅम, संगीता सोनवणे मॅम, कमल खोटरे मॅम, ग्रामपंचायत अधिकारी आशा जाधव मॅम, शिक्षकवृंद, CHO डॉ. तृप्ती आस्वारे, ANM, MPW, BF,आशा सेविका, अंगणवाडी सेविका , ग्रामस्थ, जवळपासच्या गावातील महिला व बालके हे मोठ्या संख्येंने उपस्थित होते.. सर्वप्रथम कांबडनाच या आदिवासी पारंपरिक नृत्याने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले .श्रेयस गारे या बालकाला आदर्श गृहभेट बाबत भेट देऊन AAA कामकाजाचे निरीक्षण केले. मान्यवरांनी सामुंडी व टाके देवगाव विभागात सुरू असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.मान्यवरांच्या हस्ते लावण्या, तनुष, हिमाक्षी व या LBW परंतु आता साधारण श्रेणीत असलेल्या सहा महिने पूर्ण बालकांचा अन्नप्राशन कार्यक्रम घेण्यात आला.. तसेच मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत मार्फत अंगणवाडीस मिळालेल्या Smart TV चे inauguration करण्यात आले. यानंतर जन्मतः कमी वजन असलेली परंतु योग्य काळजी नंतर साधारण श्रेणीत आलेल्या बालकांचे पालक, अंगणवाडी ताई व आशाताई,ANM, पर्यवेक्षिका यांच्याशी मान्यवरांनी संवाद साधला.. पालक मेळाव्यात अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांनी भविष्याचे झाड, संवेदनशील पालकत्व, घरी बनविलेली खेळणी, घरगुती वाद्य, आहार प्रदर्शन, झुंबर, बाहुलीघर, गुहा, पाण्याचे खेळ, आपले आरोग्य, संपवुया आहाराचे लॉकडाऊन, सेल्फी पॉइंट, गरोदर मातेशी संवाद सह विविध स्टॉल लावले होते. सगळ्याच स्टॉल चा अधिकाऱ्यांसह उपस्थितांनी मनसोक्त आनंद घेतला.. पुन्हा एकदा लहानपण अनुभवन्याची संधी मिळाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. ICDS, शिक्षण, आरोग्य व ग्रामपंचायत विभागाच्या संयुक्त विद्यमाने पालक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *