हरीश तूपलोंढे (प्रतिनिधी)
जि प आदर्श शाळा बेझे , ता त्र्यंबकेश्वर, जि नाशिक येथे जागतिक महिला दिनानिमित्त माता भगिनींचा मेळावा संपन्न झाला.या प्रसंगी सर्व माता भगिनींचा संगित खुर्ची, बाटली खेळ इ.स्पर्धेत ज्या भगिनींनी उत्तम कामगिरी केली त्यांचा मुख्याध्यापक श्री.सोनवणे सर यांनी सत्कार केला.शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषण व गाणे सादर केले.श्रीमती अनिता तुपलोंढे शा.व्य.समिती सदस्य बेझे ,श्रीमती सुरेखा वाकसरे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्रीमती यमुना पोटींदे सरपंच ग्रामपंचायत बेझे चाकोरे , प्रमुख पाहुणे श्री.हरीश तुपलोंढे यांनी भुषविले.उपस्थित माता ,भगिनी यांचे पुष्प देऊन पी.एम.भोये ग्रामसेवक बेझे चाकोरे यांनी स्वागत केले.मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेझे यांच्या वतीने उपस्थित माता भगिनी यांना भेटवस्तू देण्यात आली.श्री.हरीश तुपलोंढे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती बेझे यांच्या वतीने उपस्थित माता भगिनी यांना फराळ वाटप करण्यात आले. श्री शरद जाधव सर यांनी सुत्रसंचलन केले. श्री प्रकाश देवांग ,श्री.भाऊ लहारे,श्रीमती वैशाली महाजन ,श्रीमती.प्रगती तुपलोंढे शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले . कार्यक्रमासाठी श्रीमती यमुना पोटींदे सरपंच ग्रामपंचायत बेझे चाकोरे, श्रीमती अर्चना चव्हाण उपसरपंच ग्रामपंचायत बेझे चाकोरे, हरीश तुपलोंढे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती बेझे, श्रीमती बेबीताई हासळे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती बेझे, श्रीमती अनिता तुपलोंढे, सदस्य शाळा व्यवस्थापन समिती बेझे,श्री.कैलास पोटींदे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती बेझे,श्री.अशोक चव्हाण सदस्य शाळा व्यवस्थापन समिती बेझे ,श्री.प्रभाकर सोनवणे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेझे उपस्थित होते.श्रीमती वेशाली महाजन यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन आभार प्रकट केले.
