जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने देशात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, त्यातच एक म्हणजे इगतपुरी तालुक्यातील नांदडगाव येथे जिल्हा परिषद शाळा नांदडगाव येथील शाळेत चक्क महिलांची शाळा भरताना दिसली. महिला दिनाच्या अनुषंगाने ” मुलगी शिकली प्रगती झाली ” या विचाराने गावातील पाल्य व महिला एकत्र येऊन शाळेवर महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात महिला बचत गट प्रामुख्याने नियोजन करीत होते . मुलींना शिक्षणाची किती गरज आहे व त्या नारीशक्तीची जाणीव करण्यासाठी एक दिवसाचा जणू काही वर्ग भरला होता . याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री पठाण सर , गुंजाळ सर व चव्हाण सर तसेच प्रियांका खातळे यांनी शाळेतील मुली व महिलांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमात गावातील सर्व ग्राम संघातील बचत गट महिला उपस्थित होते. यावेळी महिलांचा सत्कार व मिठाई वाटप करण्यात आली.
“मुलगी शिकली प्रगती झाली” ; नांदडगाव येथील शाळेत महिलांचा भरला वर्ग
