आज दि.08/03/2025 रोजी इगतपुरी जुना गावठा जि.नासिक येथे सौ. अर्पिताताई विजय रुपवते यांच्या निवासस्थानी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले,माता रमाई यांच्या प्रतिमां समोर सौ.अर्पिताताई रुपवते , आरती पगारे,भरीत यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून, तसेच सुगंंधी उदबत्ती लावून वातावरण सुगंधित केले.पूजा भोसले, श्वेता जगताप, सुवर्णा बनसोडे, सुमित्रा वर्मा, जगताप ताई,पूजा बनसोडे यांनी पुष्पहार व पुष्प अर्पण करीत अभिवादन केले. सदर प्रसंगी अविनाश भरीत यांनी सावित्रीमाईच्या जीवनावर आधारित माहिती देत अभिवादन केले. तर पूजा भोसले यांनी सदर राष्ट्रमातांच्या कार्याबद्दल माहिती दिली.सौ.अर्पिताताई रुपवते यांनी राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, राष्ट्रमाता सावित्रीमाई,व माता रमाई यांच्या योगदानाबद्दल थोडक्यात माहिती देत आपली सदर राष्ट्रमातांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. परिसरातील इतर महिला व शाळकरी मुले यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमांच्या शेवटी अल्पोपहार व मिष्ठान्न देऊन महिला दिनाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सौ. अर्पिताताई विजय रुपवते यांच्या निवासस्थानी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा
