आगळावेगळा हळदीकुंकू समारंभ ; राष्ट्रमाता यांना प्रथम अभिवादन

बातमी शेअर करा.

आज दि.01 फेब्रुवारी रोजी सौ.अर्पिताताई विजय रुपवते यांच्या निवासस्थानी इगतपुरी जुना गावठा पिंपरी रोड येथे हळदीकुंकू समारंभ आयोजित केला होता.सदर प्रसंगी पौराणिक प्रथेला फाटा देत जिजामाता भोसले, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले,माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून एक आगळा वेगळा हळदीकुंकू समारंभ संपन्न करण्याचा प्रयत्न केला गेला.स्त्री स्वाभिमानाचा परिचय देत या महान त्याग मूर्तीने महिला उद्धारासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून सामाजिक उद्धारक मातांचा प्रतिमेचे पूजन करून हळदी कुंकू समारंभ संपन्न केला. सदर प्रसंगी परिसरातील महिला वर्ग उपस्थित होता.महिला हक्क शिक्षण महापुरुष व राष्ट्रमाता यांच्या विषयी महती सांगण्यात आली.सौ.अर्पिताताई रुपवते यांचेसह समस्त महिलावर्गाला वाणाच्या रुपात महीला पर्स,निरंजन,भेटवस्तू देण्यात आल्या.तसेच अल्पोपहार व खिर वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *