ग्रुप ग्रामपंचायत वाकी बिटोर्ली येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरी आदेश व पहिला हप्ता वितरण

बातमी शेअर करा.

प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक 2 अंतर्गत 44 लाभार्थ्यांना मंजुरी आदेश व पहिला हप्ता वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गृहमंत्री, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि ग्रामविकास व पंचायत राज मंत्री यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम ग्रुप ग्रामपंचायत वाकी बिटोर्ली येथे आयोजित करण्यात आला.या वेळी ग्रामपंचायत अधिकारी डॉ. ज्योतीताई केदारे, प्रशासकीय अधिकारी श्रीमती मेघा अहिरे, तसेच ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, जेष्ठ नागरिक, ग्रामरोजगार सेवक सपन परदेशी, ग्रामपंचायत कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, महिला बचत गट वाकी , महिला भगिनी व तरुण मित्र परिवार उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान लाभार्थ्यांना मंजुरी आदेश प्रदान करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना निवास उभारण्यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य मिळणार असून त्यांना हक्काचे घर मिळविण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक अधिकारी-कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या योजनेमुळे गावातील गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *