आज दिनांक 22 मार्च 2025 रोजी इगतपुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मीटिंग घोटी बुद्रुक तालुका इगतपुरी येथे आयोजित करण्यात आली. श्री समर्थ सह्याद्री हॉस्पिटल सभागृहामध्ये या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार हिरामणजी खोसकर साहेब हे प्रमुख उपस्थित होते . सदर मीटिंगमध्ये काही विषयांवर चर्चा, मार्गदर्शन व विचार विनिमय करण्यात आले. पक्ष सभासद नोंदणी करणे तसेच बूथकेंद्र निहाय गाव-वस्ती ठिकाणी बूथ प्रमुख नेमणे , आगामी ग्रामपंचायत जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुकीबाबत चर्चा विनिमय करण्यात आली . पक्षाची ध्येयधोरणे नागरीकांपर्यंत पोहोचविणे व विविध उपक्रम राबवणे , नागरिकांच्या समस्या अडचणी प्रश्न सोडविण्याबाबत पक्षामार्फत प्रयत्न करणे. तालुका कार्यकारणी, विविध सेल, युवक युवती कार्यकारणी नियुक्ती करणे. गाव तेथे पक्षाची शाखा उघडणे या विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा अध्यक्ष श्री विष्णुपंत म्हैसधूने ,आमदार हिरामण खोसकर साहेब, माजी आमदार शिवराम झोले साहेब , प्रदेश सरचिटणीस मा .गोरख बोडके, माजी सभापती ज्ञानेश्वर लहाने, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन मामा माळी , संदीप गुळवे, तालुकाध्यक्ष पांडुरंग वारंगुसे, युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, विध्यार्थी जिल्हा अध्यक्ष अजय खांडबहाले,गटप्रमुख नादगांवसदो मदन कडू, डॉ सुधाकर जगताप, वैद्यकिय मदत सेल डॉ अध्यक्ष महेंद्रजी शिरसाठ, युवक तालुका अध्यक्ष राहुल उत्तमराव सहाणे, युवा नेते तुकाराम वारघडे, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष किरण मुसळे, मा सरपंच हरीश चव्हाण, महिला तालूका अध्यक्ष .संरपच भाऊसाहेब धोंगडे, गटप्रमुख वसंत भोसले, कृषी सेल ज्ञानेश्वर कडू, सखाराम गव्हाणे, जि उप अनिल पढेर, भाऊ पासलकर, डॉ सेल तालुका अध्यक्ष श्रीराम लहामटे, मा सभापती विष्णू चव्हाण, आगरी सेना तालूका अध्यक्ष नारायण वळकंदे, संतोष रौंदळे, ईश्वर परदेशी, युवा नेते निवृत्ती भगत, जिल्हा उपअध्यक्ष अरुण पोरजे,मा अध्यक्ष बाळासाहेब गाढवे, सरपंच गोपाळ पाटील, सरपंच शिवनाथ काळे,प्रतिक गोवर्धने, अमोल खांडबहाले, गणेश गाडेकर, ऋषी साळवे, करण साळवे,संचालक खंडेराव भोर, गणेश म्हसणे ,पंढरी लंगडे संरपच पांडूरंग खातळे, जिल्हा संघटक संजय कोकणे, सरपंच गोपाळ पाटील , महिला व युवक जेष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विविध विषयांवर बैठक संपन्न
