20 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळे सत्याग्रह केला या अनुषंगाने आज भारतीय बौद्ध महासभा इगतपुरी तालुका अंतर्गत मुकणे येथे महाड क्रांती दिन व समता सैनिक दल वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला समता सैनिक दलाच्या सैनिकांनी मानवंदना दिली तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा प्रत्येक गावोगावी सभासद तयार करणे व धम्माचा प्रसार करणे त्याचप्रमाणे प्रत्येक गावात समता सैनिक दलाचा सैनिक तयार करणे व त्यांना योग्य ते प्रशिक्षण देणे , गावोगावी धम्म संस्कार शिबिर राबवणे , गाव तेथे बौद्धाचार्य या विषयक प्रस्ताव मांडण्यात आला , सदर कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष श्री साहेबराव गांगुर्डे यांनी स्वागत पर शुभेच्छा दिल्या.
यावेळी बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस शरद सोनवणे, कार्यालयीन सचिव शांताराम उबाळे , पर्यटन सचिव संजय सोनवणे, लोकराज्य प्राईम न्यूज चे संपादक श्री सुनील पगारे , रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष बौद्धाचार्य प्रवीण साबळे, रिपाई तालुका अध्यक्ष भाऊसाहेब साबळे, ग्रामपंचायत सदस्य लहानु साबळे , मा. रतन उबाळे, ग्रा.प .सदस परशुराम साबळे, रुंजा साबळे , सिताराम साबळे अंकुश साबळे, लहानू साबळे, सचिन उबाळे , गोरख साबळे आदी मान्यवर उपस्थित होते
