दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा (पश्चिम) अंतर्गत “संविधान समर्थक समाज जोडो अभियान” व भारतीय बौद्ध महासभा इगतपुरी तालुका कार्यकारिणीची पुनर्गठण प्रक्रिया शुक्रवार दि. १४-३-२०२५ रोजी १ वा. सुगत बुद्धविहार इगतपुरी येथे आयु.कृष्णा सोनवणे (संस्कार उपाध्यक्ष ना.जि. पश्चिम) यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आयु.शरद भोगे (सरचिटणीस, ना.जि. पश्चिम) यांनी केले. जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन तसेच दीप प्रज्वलन, सुगंध पूजा होऊन सामुदायिक वंदना घेण्यात आली.सुरवातीला फाल्गुन पौर्णिमेचे महत्त्व मनोज गाडे तसेच संविधान समर्थक समाज जोडो अभियान या विषयावर मनोज मोरे यांनी मार्गदर्शन केले.
भारतीय बौद्ध महासभा इगतपुरी तालुका कार्यकारिणीची पुनर्गठनासाठी तालुक्यातील इच्छुक पदाधिकाऱ्यांनी भरलेल्या अर्जाची छाननी करून इगतपुरी तालुका अध्यक्ष पदी साहेबराव वामन गांगुर्डे तर सरचिटणीस पदी शरद सोनवणे तसेच कोषाध्यक्षपदी बळीराम शिरसाट,संस्कार उपाध्यक्ष पदी सुनील भीमा पगारे, कार्यालयीन सचिव पदीशांताराम बाबुराव उबाळे हिशोब तपासणीस पदी गिरीश राजू वानखेडे, संस्कार सचिव तुकाराम भिकाजी पवार, पर्यटन सचिव पदी संतोष गोविंद उनवणे, पर्यटन सचिव पदीसंजय भास्कर सोनवणे तसेच तालुका संघटक पदी नंदू मोहन पगारे, किशोर चिंतामण रोकडे, मिलिंद मधुकर शिंदे यांची निवड जिल्हा निवड समितीतील शरद भोगे, रितेश गांगुर्डे, कृष्णा सोनवणे, प्रकाश जगताप, मनोज गाडे, रत्नाकर साळवे, मनोज मोरे, भाऊलाल कटारे यांनी केली.
या कार्यक्रमास संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष वि,म.रुपवते तसेच कमलाकर गांगुर्डे, संजय भास्कर सोनवणे, हिरामण नाना उबाळे, रमेश सतीश ओव्हाळ, एन के सोनवणे, कृष्णा पंडित,प्रभाकर चिकणे उपस्थित होते. नूतन कार्यकारिणीचे उपस्थितांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जि.कोषाध्यक्ष रितेश गांगुर्डे यांनी केले.
