घोटी (ता. इगतपुरी), दि. १४ एप्रिल २०२५ –
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त ‘ब्रदर ग्रुप’चे संस्थापक आनंदभाऊ बर्वे यांच्या संकल्पनेतून व आयोजनातून एक आगळा-वेगळा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. दिव्यांग बांधवांसाठी मोफत सेवा व साहित्यवाटप करत जयंतीचे औचित्य सामाजिक कार्यातून साधले गेले.या कार्यक्रमात घोटी पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. विनोद पाटील साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन व संविधान पूजन पार पडले. प्रहार संघटनेचे इगतपुरी तालुका अध्यक्ष नितीन गव्हाणे (पाटील), मा. उपसरपंच विजय चंद्रमोरे, लोकराज्य प्राईम न्यूजचे संपादक सुनिल डी. पगारे, तसेच इतर मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.उपक्रमांतर्गत घोटी परिसरातील गरजू दिव्यांग बांधवांसाठी मोफत रिक्षा सेवा, व्हीलचेयर, तीन चाकी सायकल तसेच किराणा साहित्य किट यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा एक गोड क्षण म्हणजे त्यांना मोटीचूर लाडू वाटप करत जयभीम घोषणांद्वारे वातावरण भारावून टाकले गेले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य नितीन नेटावटे गुरुजी (घोटी बु.) यांनी केले. त्यांनी बौद्ध वंदना घेत सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमात ब्रदर ग्रुपचे पदाधिकारी केत जगताप, सागर जाधव, राहुल दाभाडे, करण गाय कवाड, बाळू बर्वे, के. एल. यादव, रंजीत सोनवणे, सुमित बर्वे, शंकर वाल्मिक, देवा बर्वे, विक्रीम जाधव, अनिल कडलक, सोमनाथ लहांगे, दिनेश आहीरे, विजय मोरे, सुधाकर मोरे आदींनी सक्रिय सहभाग घेतला.सामाजिक बांधिलकीचे भान जपत ब्रदर ग्रुपने उचललेले हे पाऊल नक्कीच प्रेरणादायी ठरले असून भविष्यात असे अनेक उपक्रम राबविण्याचा निर्धार संस्थापक आनंदभाऊ बर्वे यांनी व्यक्त केला.
