काळू गांगुर्डे (त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी)
मा. विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा वाघेरा याठिकाणी आज 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख अतिथी श्री. सुहास शुक्ल (साहेब स्वील इंजिनिअर बिल्डर अँड डेव्हलपर्स)यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच स्काऊट गाईड चे ध्वजारोहण मा. मधुकर फटांगरे सर (कार्यकारिणी सदस्य म. स. से. संघ नाशिक)यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथीनी आपल्या मनोगतातून भारतीय संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून सांगताना विद्यार्थांनी आपल्या जीवनात शिस्त व आदरयुक्त भावना जोपासली पाहिजे व देशसेवेसाठी आपले योगदान दिले पाहिजे याविषयी मागदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. नितीन पवार यांनी केले. इयत्ता ३ची विद्यार्थिनी हर्षदा खेडुलकर, 10 वी चा विद्यार्थी समीर पवार , 12 वी विज्ञान ची विद्यार्थिनी योगिता महाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्काऊट गाईड व MCF च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना देवून संचालन सादर केले. तसेच क्रीडाक्षेत्रात व विविध परीक्षांमध्ये नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.सूत्रसंचालन राजेश भोये व निलेश लहारे यांनी केले व शेवटी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. संदीप चौधरी यांनी पाहुण्यांचे आभार मानले.
