घोटी (ता. इगतपुरी) – भारतीय बौद्ध महासभा, घोटी शहर महिला कार्यकारणी यांच्या वतीने वर्षावास २०२५ अंतर्गत आयोजित पुष्प ५ वे प्रवचन रविवार, दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजता नालंदा बुद्धविहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, घोटी येथे अतिशय मंगलमय आणि धम्ममय वातावरणात पार पडले.
या प्रवचनासाठी प्रमुख वक्ते म्हणून केंद्रीय शिक्षक आयु. रवींद्र घाटेसाव गुरुजी उपस्थित होते. “बौद्धांचे सण आणि मंगलदिन” या विषयावर त्यांनी उदाहरणांसहित सुसंगत मार्गदर्शन केले. यानंतर महिला कार्यकारणीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पुष्पपूजा, दीपधूप पूजन, त्रिशरण पंचशील, बुद्ध वंदना, भिमस्मरण व भिमस्तुती यांसह करण्यात आली. या सर्व धार्मिक विधींमुळे परिसरात सकारात्मक ऊर्जा आणि शांतीचा अनुभव आला.
कार्यक्रमाचे संयोजन आयु. चींधू (बाळू) देवराम रूपवते आणि आयुनी. मंगलाताई रूपवते यांनी केले.तसेच आयु. नंदूदादा पगारे (ता. संघटक), आयु. विलास रूपवते, आयु. चंद्रकांत रूपवते (विहार अध्यक्ष), आयु. प्रभाकर चिकणे गुरुजी आदी मान्यवरांच्या हस्ते पूजा व वंदना पार पडली.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुनी रमाताई पटेकर (संस्कार सचिव, घोटी शहर) यांनी प्रभावीपणे केले.कार्यक्रमानंतर आयु चींधू रूपवते व आयुनी मंगलाताई रूपवते यांच्या हस्ते धम्मदान देण्यात आले व उपस्थितांना नाश्त्याचे वितरण करून दान पारमिता पार पाडली.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत व आभारप्रदर्शन करण्यात आले.
आयु नंदूदादा पगारे (संघटक इगतपुरी तालुका),आयु प्रभाकर चिकणे गुरुजी, आयु राहुल शिंदे गुरुजी (बौद्धाचार्य),आयु बाळू रूपवते, आयु विलास रूपवते, आयु चंद्रकांत रूपवते (विहार अध्यक्ष),आयु मारुती रूपवते, आयु राहुल बर्वे,आयुनी सुप्रियाताई रूपवते (कोषाध्यक्ष),आयुनी मथुराताई कोळे (उपाध्यक्ष – संस्कार),आयुनी कल्पनाताई दिवेकर, आयुनी रमाताई पटेकर (संस्कार सचिव),आयुनी मंगलाताई रूपवते (पर्यटन सचिव),आयुनी कल्पनाताई रूपवते (संरक्षण उपाध्यक्ष),आयुनी लंकाताई वाहुले, आयुनी पुष्पाताई रोकडे, आयुनी ललिताताई भोले,आयुनी कल्पनाताई आहिरे, आयुनी जयश्रीताई रूपवते, आयुनी जनाबाई त्रिभुवन,आयुनी राधाबाई रूपवते, आयुनी विमलबाई रूपवते, आयुनी मिराबाई रूपवते,आयुनी शिताबाई रोकडे, आयुनी दीपिका रूपवते, आयुनी सिताबाई रूपवते आदी उपस्थित होते.
