इगतपुरी तालुक्यातील शेनवड येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेमध्ये दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. ढोल, लेझीम पथक, म्युझिक सिस्टीम व पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी सारा परिसर निसर्गप्रेमाने निनादला.
शाळेच्या परिसरात झाडे लावण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने आजूबाजूच्या डोंगरावर व गायरान जागेवर वृक्षारोपण करण्यात आले. शाळेस देण्यात आलेल्या 301 झाडांच्या टार्गेटपेक्षा जास्त झाडे लावण्यात शाळेने यश मिळवले.वड, पिंपळ, चाफा, जांभूळ, आंबा, गुलाब आणि विविध फुलझाडे लावण्यात आली.
प्रत्येक कर्मचाऱ्याला 10 झाडांचे लक्ष्य देण्यात आले होते. याशिवाय “एक पेड माँ के नाम” उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावाने एक झाड लावण्यात आले व त्याचा फोटो वर्गशिक्षकांसह घेतला गेला. वृक्षारोपणाचे सर्व फोटो ‘अमृत वृक्ष’ ॲपवर अपलोड करण्यात आले
परिसरातील झाडांचे संवर्धन व्हावे यासाठी झाडांवर आकर्षक फलक लावण्यात आले.या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मा. मुख्याध्यापक श्री. प्रदीप यनंगुलवार सर यांच्या नेतृत्वाखाली श्री. जाधव सर, श्री. अफ्रे सर, श्रीम. एस. पगारे मॅडम, श्रीम. पाटील मॅडम, श्रीम. एल. पगारे मॅडम, श्री. निकस सर, श्रीम. सानप मॅडम, श्रीम. काळे मॅडम, श्रीम. निकम मॅडम, श्रीम. उदबत्ते मॅडम, तसेच सर्व वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचारी व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
