पांडुरंग दोंदे , तालुका प्रतिनिधी
प्रबोधन विचार मंच त्र्यंबकेश्वर च्या वतीने श्रीचंद्रा लॉन्स ,बस स्टँड शेजारी जव्हार फाटा त्र्यंबकेश्वर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांचा स्मृती दिन व त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.
मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमास किरण मोहिते( मोटीव्हेशनल ट्रेनर) व वनिता बागुल ( प्रोफेसर) यांनी रामजी बाबा आंबेडकर व त्यागमुर्ती रमाई आंबेडकर व बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या जीवनावर प्रमुख मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधुरी सोनवणे ह्या होत्या.
कार्यक्रमास सोनम गांगुर्डे,रत्ना तालखे,चंदर कांबळे, अरुण शिंदे,हरिभाऊ सोनवणे ,हरिभाऊ अंबापूरे,मधुकर कडलग, भागवत गांगुर्डे , संजय कांबळे,रमेश गांगुर्डे,रमेश जाधव,मधुकर कांबळे,बौद्ध उपासक उपासिका व समाज बांधव उपस्थित होते.
