नाशिक | प्रतिनिधी – नवनाथ गायकरअखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत उत्तर महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवयित्री सौ. सुनिता विजय वाळुंज यांची तर नाशिक महिला जिल्हा अध्यक्षपदी सौ. आरती सोनवने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही घोषणा नुकतीच परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरद गोरे यांनी अधिकृतपणे केली.
सौ. सुनिता वाळुंज या सध्या राष्ट्रीय भागवत धर्म परिषद महिला अध्यक्ष सिन्नर तालुका म्हणून कार्यरत असून त्यांना आजवर साहित्य क्षेत्रातील ३७ पुरस्कार मिळाले आहेत. दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे नुकतेच त्यांना सावित्रीबाई फुले नॅशनल एक्सलन्स लेडी अवार्ड मिळाले आहे. त्या रामकमल लॉन्स या संस्थेच्या संचालिका असून, एक सक्रिय समाजसेविका देखील आहेत.
दुसरीकडे, सौ. आरती सोनवने या परिषदेच्या कार्यात सक्रिय असून, एक शिक्षिका व कवयित्री म्हणून त्या नाशिक जिल्ह्यात विशेष ओळखल्या जातात.या दोन्ही नियुक्त्यांचे मा. शरद गोरे यांच्यासह परिषदेचे वरिष्ठ पदाधिकारी देविदास खडताळे, फुलचंद नागटिळक, नवनाथ अर्जुन पा. गायकर, अमोल कुंभार, माणिकराव गोडसे, बाळासाहेब गिरी, रविंद्र पाटील, सौ. विद्या पाटील, प्रदीप पाटील, योगेश जोशी, राजू आतकरी, श्रीराम तोकडे, संजय कान्हव, रमेश मुकणे, देविदास शिरसाट, पुनम राखेचा, बाबासाहेब थोरात, रोहिणी चौधरी, प्रांजल कोकणे आदींनी मनःपूर्वक अभिनंदन करून स्वागत केले आहे.
“साहित्यिक कार्याला बळकटी मिळणार” – नवनाथ गायकर
या नियुक्तींवर प्रतिक्रिया देताना उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नवनाथ अर्जुन पा. गायकर म्हणाले, “सौ. सुनिता वाळुंज व सौ. आरती सोनवने यांच्या रूपाने परिषदेच्या साहित्यिक कार्यास अधिक गती व बळकटी मिळेल. त्यांच्या निवडी सार्थ आणि प्रेरणादायी आहेत. त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!”
