बेझे जिल्हा परिषद शाळेत चप्पल व शैक्षणिक साहित्य वाटप; वृक्षारोपण, अल्पोपहार आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार

बातमी शेअर करा.

हरीश तूपलोंढे, त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी (26 जुलै 2025):तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेझे येथे शनिवारी दि. 26 जुलै रोजी विद्यार्थ्यांसाठी चप्पल व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम पार पडला. नाशिक येथील एल. डी. पाटील अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूलचे अध्यक्ष श्री. यश कटारे, मुख्याध्यापिका सौ. ज्योती कटारे/पाटील व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष श्री. संदिप चव्हाण यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानदेवतेच्या सरस्वती पूजनाने झाली, तर विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या वतीने शाल, पुस्तक व गुलाबपुष्प देऊन सन्मानपूर्वक करण्यात आले.

विद्यार्थ्यांना चप्पल व शैक्षणिक साहित्य वाटप झाल्यानंतर श्री. यश कटारे आणि श्री. संदिप कापसे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. सौ. ज्योती कटारे/पाटील यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या तसेच स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण या बाबतीत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आदर्श नागरिक होण्यासाठी शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना मिसळ-पावचा अल्पोपहार देण्यात आला.कार्यक्रमाला श्री. यश कटारे, सौ. ज्योती कटारे/पाटील, श्री. संदिप चव्हाण, श्री. कैलास पोटींदे (सरपंच), श्री. अशोक चव्हाण (उपसरपंच), श्री. हरीशचंद्र तुपलोंढे (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष), श्री. राजाराम चव्हाण (माजी सरपंच), श्री. सुरेश चव्हाण (माजी सरपंच), श्री. पंडीत तुपलोंढे (तंटामुक्ती उपाध्यक्ष), श्री. भाऊराव चव्हाण (माजी तंटामुक्ती अध्यक्ष), श्री. शरद जाधव,श्री. जगन लहारे,श्री. भास्कर तुपलोंढे, श्री. संदिप तुपलोंढे, श्री. सोमनाथ चव्हाण (शाळा व्यवस्थापन समिती सदस्य), सौ. अनिता तुपलोंढे, तसेच इतर ग्रामस्थ, महिला, पालक आणि विद्यार्थी आदी उपस्थित मान्यवर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *