काळू गांगुर्डे(त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी)ता.16
त्र्यंबकेश्वर गावातील अत्याधुनिक बस स्थानक प्रवाशांच्या सेवेत सुरुवात झाल्याने प्रवासी, भाविकांना दिलासा मिळाला आहे.नवीन भव्य दिव्य बस स्थानक बांधण्यात आले आहे.स्थानकात पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्याची त्र्यंबकेश्वर गावातील व स्थानकात पिण्याचे पाण्याची सुविधा करण्याची मागणी प्रवासी व विद्यार्थ्यांनी केली आहे.त्र्यंबकेश्वर गावातील जुने बस स्थानक पाडून नवीन बस स्थानक निर्माण करण्यात येऊन नुकतेच लोकार्पण करण्यात आले. बस स्थानक तोडणे आणि नवीन बसस्थानक बांधणे यामध्ये जवळपास साडेपाच वर्ष गेली.गेली साडे पाच वर्ष त्रंबक गावातील लोकांना , यात्रेकरूंना गजानन महाराज मंदिर समोरील मेळा स्थानक हेच बस स्थानक झाले होते. यात प्रवाशांचा मोठा वेळ जायचा खर्च देखील वाढायचा. गावातील बसस्थानक सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.गावातील या नवीन बसस्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी मोठी जागा आहे खुर्च्या टाकण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक असे बस स्थानक निर्माण तयार करण्यात आले असून बस स्थानकामधून त्र्यंबकेश्वर चे डोंगर भाविकांचे लक्ष वेधून घेतात. नाशिककडे तसेच बाहेरगावी आणि नाशिकच्या ग्रामीण भागात जाणाऱ्या शेकडो बसेस येथून सुटतात त्यामुळे या बसस्थानकावर ग्रामीण भागातील ग्रामस्थ यात्रेकर प्रवासी तसेच शिक्षणासाठी , रोजगारासाठी , येजा करणारे विद्यार्थी यांची मोठी गर्दी असते.परंतु या ठिकाणी पिण्याचे पाण्याची टाकी पानपोई सारखी सुविधा अद्याप केलेली नाही , तरी या ठिकाणी पिण्याचे पाण्याची टाकी बांधावी . पिण्याचे पाणी मिळेल असे नियोजन करावे अशी मागणी प्रवाशांकडून विद्यार्थ्यांकडून होऊ लागली आहे. बसस्थानकात चौकशी केली असता तूर्तास तरी बस स्थानकात पाणपोई सुविधा सोय नसली तरी पाठीमागील बाजूस नळ कनेक्शन टाकी आहे. सुलभ शौचालय देखील सेवा आहे. अलीकडेच मोठा गाजावाजा करीत हे बसस्थानक सुरू झाले आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त उत्पन्न देणारे बस स्थानक म्हणून त्र्यंबकेश्वर बस स्थानकाची ख्याती आहे. उन्हाळा लक्षात घेऊन पिण्याचे पाण्याची सुविधा अथवा पानपोई सेवा बस स्थानकात सुरू करावी आहे मागणी आहे.लवकरच सुविधा सुरू होईल असे देखील सांगण्यात आले आहे.
