राजुर पाटी (ता. इगतपुरी, जि. नाशिक):नाशिक-मुंबई महामार्गावर आज सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर अपघात घडला. राजुर पाटीजवळ MH01BU9006 या क्रमांकाच्या एक्सवी (XUV) कारने MH15GC1287 क्रमांकाच्या मोटरसायकलला जबर धडक दिली. या धडकेत मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीस जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेने (गोंदे फाटा) तत्काळ नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्याआधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव दत्तासहदेव जाधव (वय 75) असून ते राजुर बाहुला येथील रहिवासी होते. वृद्ध अवस्थेतील जाधव हे आपल्या मोटरसायकलवरून जात असताना भरधाव एक्सवी कारने जोरदार धडक दिली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
