दिनांक २८ मार्च २०२५ रोजी. हॉटेल शगुन रिसोर्ट टाकेघोटी येथे ग्रामपंचायत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती संघटनेची भव्य कार्यकारणी तसेच पदअधिकारी,सभासद यांची नोंद व निवड करण्याकरीता सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची बैठक घेण्यात आली.
गावातील सर्व गरीब बेघर गरजु कुटुंबांना घरकुल व इतर योजनेचा लाभ मिळुन देणे, ग्रामपंचायत व सर्व कामकाजावर लक्ष ठेऊन समाज कल्याण विभाग आदिवासी विभाग विकास यांच्याकडून योजना आणुन त्याचा लाभ देणे तसेच आमदार निधी , खाजदार निधी, जिल्हा परिषद निधी, पंचायत समिती निधी, ग्रामपंचायत वित आयोग व इतर शासकीय योजना व निधी सदर कामांचे व्यवस्थापन करणे नवीन सदस्य संघटने मध्य नेमण्यात येतील दलीत वस्ती व आदिवासी वस्ती तसेच गरजुवंत कुटुंबांची व्यवस्थित पायाभूत उभारणी करणे , विविध गावातील अपुर्ण काम कोणतेही तांत्रिक बाबीने काम थांबले असेल तर त्या कामांचा पाठपुरावा करेल, गावातील मूलभूत गरजांचा संघटनेकडून पाठपुरावा करण्यात येईल, असे संघटनेचे अनेक उद्दिष्ट ठरवण्यात आले. सदर मिटींगचे अध्यक्ष व मार्गदर्शक श्री अरुण जगताप मा.उपसरपंच उंबरकोन, श्री बाळासाहेब सोनवणे कुशेगाव , लोकराज्य प्राईम न्यूज़ संपादक श्री सुनिल धर्माजी पगारे ,श्री रमेश गोपाळ कडु , श्री विठ्ठल जगताप मा.उपसरपंच मोडाळे, श्री साहेबराव जगताप ना.सदो, श्री सुनिल डोळस , श्री भीमा आगिविले , श्री चंद्रकांत गांगुर्डे , श्री दिपक उघडे ,संगीताताई रंगनाथ शिणोरे उपस्थितीत सर्व मान्यवरांच्या समोर पद घोषित करण्यात आले,
ग्रामपंचायत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती संघटनेचे अध्यक्ष पदी सौ.वंदनाताई बाळासाहेब सोनवणे यांची निवड करण्यात आली व उपाध्यक्ष स्थानी कु रोहिणी अरुण जगताप, सौ माधवी सुनिल डोळस सरचिटणीस, सौ योगिता दिपक उघडे खजिनदार, सौ वंदना साहेबराव जगताप सल्लागार, श्री साहेबराव पोपटराव गांगूर्डे संघटक, सीताबाई आनंदा जगताप सदस्य, सौ चिवूबाई भीमा आगिवाले सदस्य, ताईबाई आगिविले सदस्य ,श्री साहेबराव वामन गांगूर्डे सदस्य, सौ कोमल चंद्रकांत गांगूर्डे सदस्य, सौ मंजुळाबाई पप्पु शिद सदस्य, श्री सुरेश दामू लहांगे सदस्य , यांच सर्वानच शाल श्रीफळ देउन टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त करण्यात आला तसेच श्री साहेबराव गांगूर्डे उपसरपंच यांनी उपस्थित सर्वानच आभार मानले व शेवटी सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले , सदर मिटींग विषयानुसार आज 29 मार्च रोजी गट विकास अधिकारी श्री एम.एस.वळवी साहेब पंचायत समिती इगतपुरी यांना विकास कामाबद्दल निवेदन देण्यात आले.
