सोशल नेटवर्किंग फोरमचे कार्य प्रेरणादायी – सरपंच मनिषा भरसट

बातमी शेअर करा.

( दिंडोरी ). नाशिक जिल्हयातील ग्रामीण भागात आरोग्य , शिक्षण व पाणी या मुलभूत गरजांवर काम करणारी सोशल नेटवर्किंग फोरम या संस्थेचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन तिल्लोळी
ग्रामपंचायतीच्या सरपंच मनीषा रमेश भरसट यांनी केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिल्लोळी

येथील मुलांसाठी शैक्षणिक साहित्य व ज्ञानज्योती कन्या आश्रमशाळा येथील विद्यार्थ्यांसाठी शब्दालय प्रकाशनचे ग्रंथालय पुस्तके सोशल नेटवर्क फोरमच्या वतीने मधुकर कृष्णा देवरे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त
डॉ. भक्ती अहिरे यांच्या वतीने शंभर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी त्या बोलत होत्या
.

सोशल नेटवर्किंग फोरम ही नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील बांधवांसाठी
अविरतपणे झटणारी संस्था जिल्ह्यातील पेठ सुरगाणा इगतपुरी दिंडोरी आदी भागांमध्ये या
बांधवांसाठी पाण्याची सोय शैक्षणिक सुविधा वाचनालय आदी माध्यमातून आपले कार्य करत आहे
त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून त्यातून आपण बोध घेण्याची गरज आहे असेही त्यांनी सांगितले

याप्रसंगी सोशल नेटवर्किंग फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, दिंडोरी तालुका समन्वयक
जयदीप गायकवाड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास भरसट, ग्रामपंचायत उपसरपंच दशरथ बुरुंगे ,सदस्य
देविदास पवार , रमेश भरसट, दिगंबर भरसट, वाल्मीक गायकवाड,ग्रामसेवक रावसाहेब मिस्तरी ,मुख्याध्यापक राहुल सोनवणे, मेघना
गावित,वनिता खंबाईत, हेमलता भरसट, ज्योती तुंगार, यशवंत खिल्लार, दिगंबर भरसट आदी
उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *