काळू गांगुर्डे (त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी) –
नुकत्याच पार पडलेल्या संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेत श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान ट्रस्टला रोख देणगी पावत्यांमधून बारा लाखाचे वर उत्पन्न मिळाले आहेत. जवळपास अडीच लाखाच्या तीन मोठ्या देणग्या सह वरील रक्कम मिळाली आहे. याशिवाय स्कॅनर द्वारे व दानपेटी द्वारे मिळणारे रक्कम निराळी असते. यात्रा काळात दर्शन बारी प्रवेशद्वार असे पाच ठिकाणी काउंटर देणगी सुविधा होती. देणगीदाराला लगेच पावती दिली जात होती.संत निवृत्तीनाथ मंदिर सभा मंडपाचे काम प्रगतीवर सुरू आहे. असे भाविकांना प्रत्यक्ष मंदिराला भेट दिल्यानंतर दिसल्याने भाविकांनी या देणग्या दिल्या आहेत. या यात्रेत श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष सचिव प्रसिद्धी प्रमुख यांचे सह सर्व विश्वस्त तसेच व्यवस्थापक व सहकारी कार्यरत होते असे दिसले. यंदाच्या यात्रेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी संत निवृत्तीनाथांचे दर्शन घेतले. परिणामी ट्रस्टचे शासन दरबारी वजन वाढत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान त्रंबकेश्वर नगरपालिकेने येथे पंधराशे व्यवसायिक गाळे यात्रेकरू व्यवसायिकांसाठी होते. यातून जवळपास 11 लाख रुपये तर रहाट पाळणे यातून तीन लाख असे 14 लाखाच्या आसपास उत्पन्न मिळाले. या साठी ठेका देण्यात आला होता. अशी माहिती कर व वसुली विभागा कडून देण्यात आली. एकंदरीत संत निवृत्तीनाथ मंदिर संस्थानला व नगरपालिकेला वरील प्रकारे संत निवृत्तीनाथ पावल्याचे भावना व्यक्त होत आहे. यात्रेत हौसे नवशे यांची गर्दी असते. यंदा दोन वगनाट्य मंडळ तमाशा देखील यात्रेत हजेरी लावून होते.
