“मराठी एकजुटीचा विजय! हिंदी सक्ती रद्द झाल्याने ईगतपुरीत ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष”

बातमी शेअर करा.

घोटी (प्रतिनिधी):राज्यातील महायुती सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर ईगतपुरी तालुक्यातील विविध पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला. मनसे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या तिन्ही पक्षांचे नेते व कार्यकर्ते एकत्र येऊन आज घोटी येथे एकात्मतेचे दर्शन घडवले.

ठाकरे बंधूंनी दिलेल्या मोर्चाच्या हाकेला राज्यभरातून प्रतिसाद मिळाल्यानंतर सरकारने एक पाऊल मागे घेत हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला. या पार्श्वभूमीवर ईगतपुरी तालुक्यात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी ठेका धरत आनंद व्यक्त केला आणि “मराठी एकजुटीचा विजय असो!” अशा गगनभेदी घोषणा देत एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.

याप्रसंगी उपस्थित प्रमुख नेत्यांमध्ये:शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव,राष्ट्रवादी प्रदेश सचिव उमेश खातळे,शिवसेनेचे कार्याध्यक्ष भगवान आडोळे,मनसे तालुकाप्रमुख रामदास आडोळे,मनसे जिल्हा संघटक भागिरथ मराडे,शिवसेना नेते नंदलाल भागडे, कुलदीप चौधरी, तालुकाप्रमुख राजु नाठे,माजी जि.प. सदस्य कावजी ठाकरे, गटप्रमुख देवराम म्हसणे, माजी सभापती विठ्ठल लंगडे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष काशिनाथ कोरडे, नेते सोमनाथ घारे,मनसे उपतालुकाध्यक्ष भोलेनाथ चव्हाण,कॉंग्रेस नेते बाळासाहेब वालझाडे, विक्रम मुनोथ, शहर अध्यक्ष गणेश काळे,डाॅ. रंगरेज, प्रकाश चव्हाण, राजु राकेचा, निलेश जोशी या सर्व मान्यवरांनी मराठी अस्मितेच्या विजयाचे स्वागत करत एकजुटीचा आदर्श घालून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *