घोटी (प्रतिनिधी) – इगतपुरी तालुक्यातील घोटी चौफुली येथील महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. मात्र या पुलाच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून, सिन्नरफाटा ते खंबाळे फाटा दरम्यान रस्ते चाळण झाल्यासारखे दिसत आहेत.
वाहनधारकांना दररोज खड्ड्यांतून मार्ग काढावा लागत असून त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढत आहे. यासंदर्भात गोटीराम चव्हाण, भटाटे ज्ञानेश्वर, चव्हाण ज्ञानेश्वर यांसह लोकराज्य प्राईम न्यूजचे संपादक सुनील पगारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“टोलनाका प्रशासन फक्त टोलवसुलीवर लक्ष केंद्रित करत आहे. मात्र, रस्त्यांची देखभाल आणि डागडुगी मात्र पूर्णपणे दुर्लक्षित केली जात आहे,” असा संताप वाहनधारकांनी व्यक्त केला.
वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांनी टोलनाका प्रशासनाने तात्काळ रस्त्यांची डागडुगी करून सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी, अशी मागणी केली आहे.
