मेटघर किल्ल्याच्या दरीत भीषण अपघात : अज्ञात युवकाचा मृत्यू, ओळख पटविण्याचे काम सुरू

बातमी शेअर करा.

काळू गांगुर्डे (त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी) :त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी परिसरातील गंगाद्वार, दुर्गभंडार येथून तळेगावच्या बाजूने मेटघर किल्ल्याच्या दरीत कोसळून एका अज्ञात युवकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरूवारी (दि. ३) घडली.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, एनसीआरए व आपला मित्र ओम उगले यांच्यासह शोध व बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू राहिले व अखेर सदर युवकाचा मृतदेह सापडला.

सध्या मृत युवकाची ओळख अद्याप पटलेली नाही. प्रशासनाकडून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून, स्थानिक नागरिक व पर्यटकांनी कोणतीही महत्त्वाची माहिती दिल्यास ती प्रशासनास उपयुक्त ठरू शकते, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *