मिलिंद सोनवणे इगतपुरी प्रतिनिधी | दिनांक – ५ जुलै २०२५न्यू इंग्लिश व ज्युनियर कॉलेज, आहुर्ली क-होळे येथे शनिवार दिनांक ५ जुलै २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता भव्य पालक मेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री ठाकरे देवेंद्र होते, तर उपाध्यक्षपदी श्री दत्तू माऊली गायकर यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमामध्ये विद्यालयातील इ. १०वी व इ. १२वी चा निकाल ९८% लागल्यामुळे निर्णय घेण्यात आला.समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच इ. १२ वीतील विद्यार्थिनी कु. विद्या महाले हिने ९३.४०% गुण मिळवल्याबद्दल तिचे व विद्यालयाच्या सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमांतर्गत क्र. ३ मिळाल्याबद्दल विशेष गौरव व्यक्त करण्यात आला. शाळेतील नवोदय परीक्षा, एनटीएस, एनएनएमएस, कला ग्रेड परीक्षा, जादा तास, वाचन-लेखन उपक्रमांचे पालकांनी विशेष कौतुक केले.
यावेळी मानव विकास अंतर्गत एस.टी. बस सुविधा वेळेवर न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. दुपारी व संध्याकाळी गाडी वेळेवर न येत असल्याने पालकांच्या वतीने मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
