कल्याण : ( प्रतिनिधी )
प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी (रजि ) आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई ( महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 20 मार्च 2025 रोजी, बुद्धभूमी फाउंडेशन, कल्याण (प.) येथे चवथे राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलना मध्ये प्रसिद्ध समाजसेवक डॉ. रवींद्र जाधव यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार-2025 प्रदान करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. ही घोषणा प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी (रजि )चे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक, निरंजन पाटील यांनी केली आहे.
गेल्या अनेक वर्षा पासून डॉ. रवींद्र जाधव कल्याण मध्ये अनाथ निराधार मुले, महिला, वृद्ध गोरगरीब यांच्यासाठी वृद्धाश्रम, अनाथाश्रम, वसतिगृह उभारून पुनर्वसन, संरक्षण आणि आधार देण्याचे कार्य करीत आहेत . त्याचप्रमाणे ते संविधान प्रचार प्रसाराचे कार्य देखिल करीत आहेत. त्यांचे हे संविधानिक, सामाजिक कार्य पाहून प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी (रजि ) ने त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे.
त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांना मानणाऱ्या हजारो फॉलोर्सना प्रचंड आनंद झाला आहे. ” हा पुरस्कार आपल्या एकट्याचा नसून माणुसकी धर्माच्या या कार्यात शेकडो मदतीचे हात देणाऱ्या आपल्या सर्व दानशूर मित्रांचा देखिल आहे. ” असे या पुरस्काराला उत्तर देताना डॉ रवींद्र जाधव म्हणाले
